आम्हाला फक्त शिकवू द्या" ह्या मागणीसाठी , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे काळ्या फिती लावून शिक्षक दिनी निषेध आंदोलन

By : Polticalface Team ,03-09-2023

आम्हाला फक्त शिकवू द्या लिंपणगाव( प्रतिनिधी)-- महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना शिकविण्याचे काम सोडून अशैक्षणिक कामाला जुंपण्याचे राज्य शासनाचे धोरण हे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान करणारे असून अशा अशैक्षणिक कामामुळे सर्व शिक्षक बेजार झाले आहेत,आम्हाला आता फक्त शिकूवू द्या, असा आर्त टाहो शिक्षक फोडत आहेत. याचा विचार करून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने नवभारत साक्षरता सर्वेक्षण कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला असून, महाराष्ट्रातील कोणतेच शिक्षक हे शाळाबाह्य अशैक्षणिक काम करणार नाही असे आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनास दिले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही ठराविक लोकप्रतिनिधी शिक्षकांबद्दल भ्रष्टाचारी, व्यसनी मटका खेळणारे, सावकाऱ्या करणारे असे उद्गार काढून गावात राहण्याच्या अट्टाहासाकरिता समस्त शिक्षक वर्गाचा अवमान करत आहेत .
या सर्व बाबींच्या विरोधात ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनी महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक निषेध म्हणून काळ्याफिती लावून काम करतील असे निवेदन राज्य संघाच्या वतीने शासनास देण्यात आले आहे. याची दखल न घेतल्यास नवभारत साक्षरता सर्वेक्षण कार्यक्रमाची शिक्षकांवर जबरदस्ती झाल्यास 17 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक त्या, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढतील असे राज्यसंघाने शासनास कळविले आहे. मात्र 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असल्याने मराठवाडा विभागातील आठ जिल्हे 16 सप्टेंबर रोजी मोर्चा काढतील अशी माहिती राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी दिली.
राज्यातील सर्व शिक्षकांना राष्ट्रीय कामाच्या नावाखाली जवळपास ७५ अशैक्षणिक कामे लावली जातात. याचा विपरीत परिणाम अध्ययन- अध्यापनावर होतो आणि परिणामी विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होते. गोरगरीब विद्यार्थ्यांचे खुप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशैक्षणिक कामे बेरोजगार तरुण वर्गाकडून करून घेणे आवश्यक आहे. सर्व शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक संघाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी आपण वरील सर्व गोष्टींच्या निषेधार्थ काळ्याफिती लावून आपला निषेध नोंदवावा. असे आवाहन श्रीगोंदा तालुका शिक्षक संघाचे मार्गदर्शक किसन बोरुडे, तालुकाध्यक्ष नारायण लगड, शिवाजी रायकर, बाळासाहेब अनपट, दिलीप रासकर, विजय लंके, जावेद सय्यद, कैलास ठाणगे, छाया कुदांडे, रोहिणी शिर्के, विजय नलगे, नारायण जठार, राजेंद्र गोसावी, आप्पासाहेब खामकर, बाळकृष्ण भापकर, शिवाजी कलगुंडे, नागेश लगड, सुरेश हराळ, विजय खाकाळ, सतिश खोपकर, दिपक साबळे, साईकुमार शिंदे आणि श्रीगोंदा तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी यांनी केले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.