जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज लोणी व्यंकनाथ ग्रामस्थांकडून कडकडीत बंद

By : Polticalface Team ,03-09-2023

जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज लोणी व्यंकनाथ ग्रामस्थांकडून कडकडीत बंद लिंपणगाव( प्रतिनिधी) दि १ सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यात सराटी येथे मराठा समजाच्या अंदोलना प्रसंगी अंदोलकावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज चा लोणी व्यंकनाथच्या ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत निषेध नोंदवला याप्रसंगी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सुनिल पाटील संचालक श्री शिवाजी महाराज खरेदी विक्री संघ म्हणाले जालना येथे झालेल्या घटनेमध्ये पोलिसांनी जो लाठीचार्ज केलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवताना या सर्व घटने पाठीमागे वेगळे च लोक आहेत. त्यांनी पोलिसांच्या खांद्यावर बंदुक ठेवून असे अमानुष कृत्य करून घेतले. याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही झालीच पाहिजे अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली आहे.
याप्रसंगी नागवडे कारखान्याचे माजी संचालक रावसाहेब काकडे यावेळी म्हणाले की, जालना येथील घटनेमागे महाराष्ट्र सरकारचा कुटील डाव असून, एकसंघ मराठा समाजाला फोडण्याचा डाव आहे. असे करून आपली राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे. यावेळी माजी उपसरपंच मितेश नहाटा, चेअरमन शिवाजीराव जाधव, सुनील पाटील, मिथुन नगरे, राहुल गोरखे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेचा लिंपणगाव येथेही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी लाठी चार्ज प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला आहे याप्रसंगी ग्रामपंचायतचे माजी सदस्य जालिंदर कुरुमकर यावेळी म्हणाले की मराठा समाजाच्या रास्त मागण्या मागण्यासाठी मराठा समाज शांततेच्या मार्गाने आतापर्यंत मोर्चे आंदोलने काढत आहेत शासनाला जाग यावी म्हणून जालना जिल्ह्यात मराठा समाजाने शासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांवर लाठी चार्ज केला. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा राज्यकर्त्यांकडूनच गैरवापर होताना दिसतो. त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. असे ग्रामपंचायत सदस्य जालिंदर कुरुमकर यांनी म्हटले आहे. यावेळी छगन गंठे, शब्बीर शेख, रमेश देशमुख, सतीश भगत, सुरेश लोहकरे, विलास सूर्यवंशी आदिसह बहुसंख्य मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी