देशात आता काँग्रेस शिवाय पर्याय नाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात,
2024 ला काँग्रेसच्या भावी आमदार अनुराधाताई नागवडे याच असतील -आमदार लहू कानडे
By : Polticalface Team ,05-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- देशात आता काँग्रेस शिवाय पर्याय नाही भाजप सरकारने नऊ वर्षात भुलभुलय्या राजकारण केले त्यातून जनतेची घोर निराशा झाली महागाईने जनता हैराण झाली. जनतेला ही चूक लक्षात आली. त्यामुळे आता देशात काँग्रेस शिवाय पर्याय नाही, असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हिरडगाव येथे आयोजित जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने जनसंवाद यात्रेचे आयोजन केले प्रथम नगर येथे तर सायंकाळी पाच वाजता श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे जनसंवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री थोरात पुढे म्हणाले की हिरडगाव येथे जनसंवाद यात्रेची सभा कायम स्मरणात राहील. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी व जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी या संवाद यात्रेचे सुंदर नियोजन केले. देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाचे मोठे बलिदान आहे. पंडित नेहरू यांना दहा वर्षे तुरुंगवास भोगाव लागला. परंतु ते डगमगले नाहीत देशाच्या जडणघडणीत काँग्रेसच्या थोर नेत्यांचे योगदान लाभले. गेल्या नऊ वर्षापासून देशात भाजपचे सरकार आहे. हुकूमशाहीने राज्यकारभार करून एखाद्या पक्षाने विरोध केला तर त्याला ईडीचा धाक दाखवला जातो. असे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की राष्ट्रवादीचे काही नेते जनतेच्या हितासाठी नव्हे तर स्वतःच्या हितासाठी सरकारमध्ये सामील झाले. हे राज्यातील जनतेने पाहिले. असे सांगून आमदार थोरात पुढे म्हणाले की, श्रीगोंदाच्या जडणघडणीत स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू यांनी मोठे योगदान दिले. काँग्रेस पक्षाचे विचारधारा यांच्यामध्ये होती म्हणूनच त्यांनी तालुक्याच्या या दुष्काळी भागात नंदनवन करत सहकार, सिंचन, शिक्षण क्षेत्रात बापूंनी नेत्र दीपक काम केले. त्यांचाच वारसा राजेंद्र दादा नागवडे व अनुराधाताई नागवडे ह्या सक्षमपणे चालवत आहेत. 2024 ला राज्यातच नव्हे तर देशात देखील काँग्रेसचे सरकार येणार आहे. त्यामध्ये पुढील आमदार ह्या काँग्रेस पक्षाचे अनुराधाताई नागवडे ह्याच असतील असे सांगत तालुक्यातील आम जनतेने देखील नागवडे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे निश्चितपणे तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उज्वल भविष्य मिळवून देऊ अशी ग्वाही थोरात यांनी यावेळी दिली
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून आपण काम पाहिले. हा तालुका सुज्ञ आहे. या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये सहकार महर्षी बापूंचा मोठा वाटा आहे. सर्व क्षेत्रात बापूंनी नेत्र दीपक काम केले. त्यांच्याच संस्कृतीत वाढलेले राजेंद्र दादा नागवडे व अनुराधाताई नागवडे हे दोघेही अभ्यासू आहेत. तालुक्याला काय हवे आहे? ते जाणतात. आंदोलन करून काही होईना परंतु विज पाण्याचा प्रश्न ते मार्गी लावला. त्यामध्ये काँग्रेस पक्षाला आता पुन्हा उज्वल भविष्य आहे. विकासाच्या बळावर 2024 ला अनुराधाताई नागवडे ह्याच आमदार असतील. असे सांगत काँग्रेसचा जनसंवाद यात्रेचा शुभारंभ आणि पावसाचे जोरदार आगमन हा योगायोग निश्चितपणे सर्वांना आनंददायी आहे. असे सांगून भाजप सरकारवर आमदार कानडे यांनी सडकून टीका केली.
महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षा सौ अनुराधाताई नागवडे यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारवर चौफेर टीका करत त्या म्हणाल्या की मराठा समाजाच्या प्रश्नाकडे केंद्र व राज्य सरकार गांभीर्याने पाहत नाही. याउलट सत्तेच्या बळावर आंदोलकांवर लाठी चार्ज करून सत्तेचा दुरुपयोग केला आहे. भाजप मुक्त करण्यासाठी आता सर्वांना एकसंघ राहावे लागेल. काँग्रेसचा दुसऱ्या राज्यात भूगोल आहे, परंतु महाराष्ट्राला इतिहास लाभला आहे. भाजप सरकारच्या काळात महागाईने उच्चांक केला. त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाले आहे. असे सांगत सौ नागवडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी म्हणाले की ,देशात कुठेतरी बदल हवा म्हणून जनतेने भाजपला पसंती दिली परंतु सत्तेवर येताच या सरकारला जनतेच्या प्रश्नांवर विसर पडला. सत्ता काबीज करताच भाजप सरकारने अनेक घोषणा केल्या परंतु त्याची अंमलबजावणी न करता या उलट महागाई वाढवली. गतिमान सरकार हा डांगोरा पिटला. या सरकारच्या कालावधीत कोणत्याच शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे त्याबरोबरच बेरोजगारांना काम नाही. देशात अनेक महिला बेपत्ता आहेत. त्यांचा शोध लागला जात नाही. मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावर भूमिका स्पष्ट नाही. असे सांगून ते पुढे म्हणाले की, या देशात हुकूमशाही सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवल्या जातात. काँग्रेसच्या काळात मात्र अनेक धोरणात्मक निर्णय झाले. सर्वसामान्य शेतकरी सुरक्षित होता. यापुढे 2024 ला देशात व राज्यात काँग्रेस पक्षाला उज्वल भविष्य असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी व राज्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष नागवडे यांनी केले.
या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हा समन्वय क ज्ञानदेव वाफारे, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे प्रशांत ओगले, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष धर्मनाथ काकडे, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, मनोहर पोटे, अंबादास दरेकर, योगेश भोईटे, मच्छिंद्र सुपेकर, राकेश पाचपुते, सतीश मखरे, प्रेमराज भोईटे, स्वाती दरोडे आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
प्रस्ताविक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा शंकर गवते यांनी तर आभार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष धर्मनाथ काकडे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.