गुंडेगाव शाळा व्यवस्थापन समिती रचना,कार्य,ठराव, सभा विषयी मुख्याध्यापक व समिती अध्यक्ष अनभिज्ञ...

By : Polticalface Team ,06-09-2023

गुंडेगाव शाळा व्यवस्थापन समिती रचना,कार्य,ठराव, सभा विषयी मुख्याध्यापक व समिती अध्यक्ष अनभिज्ञ... गुंडेगाव : आज शालेय शिक्षण हे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील भाग-चार, कलम २१ अनुसार प्रत्येक प्राथमिक, माध्यमिक शाळेमध्ये,शाळा व्यवस्थापन समिती (School Management Committee) स्थापन करणे अनिवार्य आहे.शालेय व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शर्ती अशा आहेत की त्या गुंडेगाव शाळा मुख्याध्यापक यांच्याकडून पायदळी तुडवल्या जात आहेत.ज्या वेळेला शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना किंवा पुनर्गठन करायची असते ती सदर समिती किमान १२ ते १६ लोकांची असणे बंधनकारक आहे. (सदस्य सचिव वगळून यापैकी किमान ७५ टक्के सदस्य बालकांचे आईवडील पालक यामधून असावेत पालक सदस्यांची निवड पालक सभेतून होणे गरजेचे आहे.आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या माता-पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देणे महत्त्वाचे असताना गुंडेगाव शाळेत असे काहीच चित्र दिसत नाही.साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थी पालकांना प्रतिनिधित्व मिळणे महत्त्वाचे आहे.यानंतर उर्वरित २५ टक्के सदस्य पुढील व्यक्तींपैकी असावेत यामध्ये स्थानिक ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले प्रतिनिधी १, शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक १,तसेच पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तंज्ञ अथवा बालविकास तंज्ञ बालकांचे आईवडील किंवा पालक सदस्यांमधून,सदर समिती, अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड होणे बंधनकारक आहे. तसेच तो राजकीय पक्षाचा नेता, कार्यकर्ता नसावेत समितीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक हे प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहत असतात.या समितीतील एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य महिला असणे आवश्यक आहे. गुंडेगाव शाळा व्यवस्थापन समिती मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतिनिधित्व देणे अत्यंत महत्वाचे असताना यावर कुठलाही विचार होत नाही बाबतचा शासन निर्णय असताना का प्रतिनिधीत्व दिले जात नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.याव्यतिरिक्त २ सदस्य विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून घ्यावेत. यामध्ये एक मुलगा व एक मुलगी असावी.शाळा व्यवस्थापन समिती (SMC स्थापनेबाबतचा शासन निर्णय असताना फलकावर का लावला जात नाही.तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ या अधिनियमातील कलम २२ अनुसार शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कार्ये पार पाडतात का? शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करून त्याची शिफारस करणे. (परिशिष्ट-अ प्रमाणे)त्या शाळेस शासनाकडून व स्थानिक ग्रामपंचायत किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे.बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे या संदर्भातील पालक, शाळा, स्थानिक ग्रामपंचायत राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्यांचा पाठपुरावा करणे हे बंधनकारक आहे.मुख्याध्यापक चार्ज देवाणघेवाण यादी तपासणी करून घेणे.अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही यांचे संनियंत्रण करणे.विद्यार्थी १०० टक्के पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहील यासाठी दक्षता घेणे.शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या निकष यांच्या पालनांचे संनियंत्रण करणे.शाळाबाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व वाढविण्यासाठी प्रयत्न करणे. शैक्षणिक गुणवत्ता शाळेतील मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे संनियंत्रण करणे.शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्चलेखे तयार करणे. शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे व दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे.निरुपयोगी साहित्य रू.1,000/- (रु. एक हजार मात्र ) किंमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे. शाळागृह, इतर शालेय बांधकाम, तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यांवर देखरेख करणे. शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखीस्वरुपात सूचना देणे व त्यांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे.आणि महत्त्वाचे समितीच्या सदस्यांना प्रवासभत्ता, दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.