करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकरिता माजी आमदार नारायण आबा पाटील गटाकडून 51 उमेदवारी अर्ज दाखल

By : Polticalface Team ,09-09-2023

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकरिता माजी आमदार नारायण आबा पाटील गटाकडून 51 उमेदवारी अर्ज दाखल करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पाटील गटाकडून 51 उमेदवारानी नामांकन अर्ज दाखल केल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वावर करमाळा तालुक्यातील जनतेचा विश्वास टिकून राहिला असून तालुका अंतर्गत निवडणुकांमध्ये जनतेने पाटील गटास भरभरून आशीर्वाद दिले आहेत. यामुळे बाजार समितीच्या या निवडणूकीत पाटील गटाचा विजय निश्चित आहे. पाटील गटाची स्पर्धा विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचेशी असून इतर गटा बरोबर टोकाचे मतभेद नाहीत. आमदार संजय मामा शिंदे यांच्या निष्क्रियतेमुळे गेली चार वर्ष झाली करमाळा तालुक्यातील विकास कामे ठप्प असून बाजार समितीच्या निवडणूकीत जनता याबद्दल निश्चितच मतपेटीतून आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार. पाटील गटाकडून या निवडणुकीसाठीच्या बाबतीत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार माजी आमदार नारायण पाटील यांना असून त्यांच्या आदेशानुसार या निवडणुकीतील विजयासाठी पाटील गटाचे कार्यकर्ते तयार असल्याचेही सांगत विजया बद्दलची खात्री तळेकर यांनी बोलून दाखवली.या निवडणुकीत पाटील गटाकडून आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक नवनाथ झोळ, पाटील गटाचे युवानेते पृथ्वीराज पाटील, केमचे सरपंच अजितदादा तळेकर, युवानेते पृथ्वीराज राजेभोसले, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, माजी सभापती बापूसाहेब पाटील, नंदाताई हरिदास केवारे,सरपंच डॉ.अमोल घाडगे, जोतिराम नारुटे, दत्तात्रय गव्हाणे, सचिन राऊत, विजयसिंह नवले, बहुजन सेनेचे नेते राजाभाऊ कदम, बाळु पवार , संदीप मारकड, सरपंच राम हरी कुदळे, नितीन हिवरे, रामेश्वर तळेकर, हनुमंत आवटे, किरण पाटील, ग्रा प सदस्य संजय तोरमल, विलास कोकने, महेश पाटील, राहुल गोडगे, विशाल केवारे,अशोक शेळके, वैभव पाटील, छगन शिंदे, बापू लोखंडे, युवराज मेरगल, शिवाजी सरडे, रियाज मुल्ला, धनु शिरस्कर, आनंद अभंग, जयराम सोरटे, रावसाहेब शिंदे,अप्पा चौगुले, मनीशाताई कांबळे,यासह अनेक पदाधिकारी या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.