राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा. .....प्रकाश भैय्या सोनसळे
By : Polticalface Team ,09-09-2023
बीड प्रतिनिधी
धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीचे
निवेदन देत असताना मल्हार सेनेच्या एका कार्यकर्त्यांने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळल्यामुळे
कार्यकर्त्याला मारहाण
सोलापूर येथे घडलेल्या घटनेचा बीड जिल्ह्यात पडसाद धनगर समाजाच्या मागण्याचे निवेदन द्यायला गेलेल्या मल्हार सैनिकांना अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या कार्यकर्त्याकडून
मल्हार सैनिकांना जी मारहाण झाली त्याच्या विरोधात राधाकृष्ण विखे यांनी राजीनामा द्यावा किंवा पक्षाने त्याची हक्कलपट्टी करावी या साठी आज
दि.8 सप्टेंबर रोजी बीड येथे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. तसेच रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी धनगर समाज व मल्हार सैनिक अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :