छत्रपती कॉलेजचा ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमाणपत्र देऊन गौरव
By : Polticalface Team ,09-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) --श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या ,श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलांस मंजूर झाल्या बद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर आणि करिअर कट्टा चे अध्यक्ष यशवंत शितोळे सर यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आले.महाराष्ट्र राज्यातील फक्त २५ कॉलेज पहिल्या यादीत सेंटर ऑफ एक्सलन्स करता पात्र ठरले आहेत. नगर जिल्ह्यातील यात फक्त ३ कॉलेज असून त्यात छत्रपती कॉलेजचा समावेश असणे ही अभिमानाची गोष्ट आहे.
शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी पुणे येथील महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने करिअर कट्टा उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल छत्रपती कॉलेजला ४ राज्यस्तरीय पुरस्कार आणि पोलीस भरतीमध्ये यश असा एकूण ४ वेळेस शिक्षण मंत्र्यांनी महाविद्यालयाचा सन्मान केला आहे.
कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी, अहमदनगर जिल्हा समन्वयक व कॉलेज समन्वयक प्रा. विलास सुद्रिक, प्रा.विजय इथापे, प्रा.धर्मनाथ काकडे, प्रा.सतीश चोरमले, प्रा. वैभव सोनवणे,प्रा.महेश गिरमकर, प्रा.स्वप्नील पवार, प्रा.विवेक शेलार व किरण बंड यांनी सन्मान स्वीकारला.
याबद्दल छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँक संचालिका सौ.अनुराधाताई नागवडे,संस्थेचे सेक्रेटरी बापूतात्या नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ तसेच कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी