मढेवडगाव येथील नगर -दौंड रस्त्या नजीकच्या दुर्गंधीयुक्त पाण्याची संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून पाच तासात दखल. वृत्त प्रसिद्ध होताच तातडीने कार्यवाही
By : Polticalface Team ,09-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव बस स्थानक नजीक नगर -दौंड राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी साचत असल्याने तेथील ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर त्या तक्रारीची दखल वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित राष्ट्रीय महामार्गावरील काम करणाऱ्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरने पाच तासाच्या आत तातडीने जेसीबीच्या साह्याने पाण्याची विल्हेवाट लावली. या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव शिंदे यांनी पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना समक्ष रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात माहिती देताच पत्रकार कुरुमकर यांनी तातडीने सदर वृत्त प्रसिद्ध करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे लक्ष घेतले वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मढेवडगावच्या प्रशासक श्रीमती हराळ मॅडम यांनी कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधून पाऊस पडल्यानंतर प्रवासी व वाहन चालकांचे तसेच व्यावसायिकांचे अतोनात हाल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला तातडीने रस्त्यावरील बेवारस पावसाच्या पाण्याची दखल घ्यावी लागली.
दरम्यान नगर -दौंड या राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण करून दुतर्फी रस्ता नेहमीच प्रवासी व वाहन चालकांमुळे वरदळीचा रस्ता ठरला गेला आहे. या रस्त्यातून दररोज हजारो वाहने नगर- दौंडकडे ये जा करतात त्या वाहनांचा वेग देखील जवळपास 80 ते 100 च्या स्पीडने वाहन चालक वाहन चालवतात. त्यामध्ये मढेवडगाव चिंभळा फाटा येथील मढेवडगाव कडून नगरकडे मार्गस्थ होताना उजव्या बाजूस पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. शुक्रवारी आठ सप्टेंबर रोजी अचानक पाऊस झाल्याने ये जा करणाऱ्या वाहन चालकांना तसेच दुचाकी स्वरांना या पाण्याचा अंदाज येत नव्हता. मातीमिश्रित काँक्रीट रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने अनेक दुचाकीस्वार वेगात घसरून जखमी झाले होते. त्यामुळे दुर्दैवाने गंभीर अपघात झाला नाही. वेळ आली होती परंतु काळ आाला नव्हत अशी स्थिती या रस्त्यावर दिसून आली. त्यामध्ये मढेवडगाव गावचा आठवडे बाजार असल्याने अनेक बाजार करणारी व्यक्ती तसेच भाजीपाला विक्रेत्यांना या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच झाल्याने वाहने अति वेगाने धावतात. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडून अनेकांचे प्राण गेले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मढेवडगाव रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने युवकाला चिडले त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. असे अनेक अपघात या रस्त्यावर वारंवार घडतात. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील साईड पट्ट्यांवर तातडीने रस्त्याची दुरुस्ती करणे तितकेच महत्त्वाचे आहे. असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी तातडीने वृत्त प्रसिद्ध करून ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे लक्ष वेधले. आणि पाच तासाच्या आत मध्येच वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या रस्त्यावरील दुर्गंधीयुक्त पाण्याची तातडीने जेसीबीच्या साह्याने खोदून विल्हेवाट लावल्याबद्दल मढेवडगावच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत या वृत्ताची तातडीने दखल घेतल्याबद्दल ग्रामपंचायत च्या प्रशासक हराळ मॅडम व ग्रामस्थांनी पत्रकार कुरुमकर यांचे देखील कौतुक केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.