श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद मोहिमेला उदंड प्रतिसाद
                      
                
            
               By : Polticalface Team ,10-09-2023
       
               
                           
              
       लिंपणगाव (प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी १० सप्टेंबर रोजी जनसंवाद मोहीम आयोजित करण्यात आली या काँग्रेस पक्षाच्या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाचे गटनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कुशल नेतृत्वाखाली व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जनसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले. प्रामुख्याने 10 सप्टेंबर रोजी येळपणे, बेलवंडी, काष्टी, गट व त्या अंतर्गत असणाऱ्या पंचायत समिती गणामध्ये काँग्रेस पक्षाचा जनसंवाद साधण्यात आला. या मोहिमेला उत्साही वातावरणात उदंड प्रतिसाद मिळाला. सकाळी नऊ वाजता देवदैठण, राजापूर, ऊकडगाव, बेलवंडी बुद्रुक, लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, काष्टी, अजनुज आणि लिंपणगाव येथे सायंकाळी सहा वाजता या गट व गणामध्ये समारोप झाला.
       यावेळी लिंपणगाव येथे आयोजाित जनसंवाद कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उदयसिंह जंगले हे होते. 
    या जनसंवाद कार्यक्रमास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक धर्मनाथ काकडे, नागवडे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव जंगले, अॅड अशोकराव रोडे, महेश तावरे, चेअरमन रवींद्र खळतकर, दादासाहेब कुरुमकर, महेश जंगले, प्रा रघुराज कुरुमकर, लक्ष्मण भोईटे, रावसाहेब रेवगे, संपत होले, मेजर प्रकाश चव्हाण, चंद्रकांत कुरुमकर, बापूराव रेवगे, डॉ दत्तात्रेय गायकवाड, रवींद्र भोंडवे, ईश्वर रेवगे विविध संस्थेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
      प्रास्ताविक नागवडे कारखान्याचे माजी संचालक अशोकराव रोडे यांनी केली यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसने सत्तेवर असताना लोकशाही व हुकूमशाहीचा कदापिही निर्णय घेतला नाही. देशात काँग्रेस पक्षाच्या काळात सर्वसामान्यांसाठी क्रांतिकारक निर्णय काँग्रेसने घेतले. भाजपने मात्र महागाई वाढवून शेतीमालाचे भाव रोखले. त्यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांची कंबरडे मोडण्याचे सांगितले.
     यावेळी विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष महेश तावरे यांनी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी काँग्रेसवर निष्ठा ठेवत आपले सर्वस्व पणाला लावले तालुक्यात काँग्रेस पक्ष नागवडे कुटुंबांनी वाढवला म्हणून 2024 ला नागवडे कुटुंबातील सौ अनुराधाताई नागवडे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी आम्ही तन-मन-धनाने सौ. नागवडे यांना विधानसभेत पाठवल्या शिवाय राहणार नाही असे सांगितले.
      तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे यावेळी म्हणाले की, भाजप सरकारने जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त गाजर दाखवले. पेट्रोल- डिझेलचे भाव वाढवून शेतकऱ्यांना देसोधडीला लावले. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भाजप विषयी अस्वस्थता आहे. काँग्रेसच्या सत्ता कालावधीत मात्र काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार दिला. याउलट भाजप सरकारच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात फक्त आश्वासने देऊन आपकी बार मोदी सरकार या जाहिरातीतून फक्त सत्ता मिळवण्याचे काम केल्याचे सांगितले.
        यावेळी काँग्रेसचे तालुका समन्वयक ज्ञानदेवराव वाखारे यावेळी म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा देशात सर्वसामान्यांच्या विचाराचा पक्ष आहे. देशातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांचे जीवन सुखी व्हावे ही धोरणे काँग्रेस पक्षाची होती. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या हितासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. सर्वच क्षेत्रात नेहरूजींनी दिशा दिली. त्यानुसार देशाने वाटचाल सुरू केली. काँग्रेसच्या काळात धरणे बांधली, काँग्रेसच्या थोर नेत्यांनी सर्वसामान्यांसाठी हितासाठी आपले सर्वस्व पणाला लावले बलिदान दिले. असे सांगून ते पुढे म्हणाले की, देशात 66 कोटी लोक शेतीवर अवलंबून आहेत. असंख्य धरणे बांधली, भाजपच्या काळात फक्त एकच धरण बांधले. भाजपकडे सत्ता देऊन देश अधोगती कडे गेल्याचे सांगून श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाचे विचारधारा डोळ्यासमोर ठेवून निष्ठेने सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी या दुष्काळी तालुक्याला वैभव मिळून दिले. सहकार, सिंचन, शिक्षण क्षेत्रात बापूंनी मोठे योगदान दिले. म्हणूनच हा तालुका आज वैभवशाली दिसतो. त्यामुळे आपण सर्वांनी यापुढे देशात काँग्रेस पक्ष बहुमताने सत्तेवर येण्यासाठी क्रियाशील राहून  काँग्रेसचे संघटन वाढवावे असे आवाहन यावेळी श्री वाफारे यांनी केले.
        सूत्रसंचालन रवींद्र भोंडवे सर यांनी केले आभार नागवडे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव जंगले यांनी मानले.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष