सामाजिक उत्तरदायीत्वाची परंपरा नागवडेंनी कायम जोपासली
By : Polticalface Team ,12-09-2023
लिंपणगाव )प्रतिनिधी)-- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, युनिसेफ इंडीया, ACWADAM यांच्या संयुक्त विद्यमाने Green Club ची स्थापना करण्यात आली.
यापूर्वी स्वर्गीय श्री शिवाजीराव नागवडे बांपुनी घालून दिलेली सामाजीक कार्याची परंपरा श्री छत्रपती शिवाजी महाविदयालयाने कायम जोपासली आहे. राजकीय अथवा मतदारसंघा पुरता विचार न करता कर्जत तालुक्यातील दुर्गम अशा निंबे गावातील चिमुकलीस मदतीचा हात दिला आहे.
महाराष्ट्रभर आव्हान केल्यानंतर सर्वाधिक मदत ५१ हजार रुपये श्री राजेंद्र दादा नागवडे यांच्या विचार प्रेरणेतून महाविदयालयातील "ग्रीन क्लब" आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या मार्फत मुलीचे वडील विशाल पंडित कोपनर यांना दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी सुपूर्द केली.
कर्जत तालुक्यातील निंबे गावातील श्री विशाल कोपनर यांची दीड वर्षाची कन्या मनस्वीला ब्लड कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आले व तिच्या पुढील उपचारासाठी ७ लाख रुपये खर्च लागणार होते. हा खर्च मोठा असल्याने आर्थीक मदतीची गरज आहे हे लक्षात घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाविदयालयाची परंपरा जोपासत या चिमुकलीला बरे करण्यास आर्थिक मदत मिळावी म्हणून Green club द्वारे प्रत्येक सदस्याने Donation Campaign राबविला. महाविदयालयातील संस्थेचे अध्यक्ष मा. श्री राजेंद्र (दादा) नागवडे, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी तसेच विदयार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविदयालयातील माजी विद्यार्थी संघटना या सर्वांनी आर्थिक मदत केली. महाविदयालयाच्या या डोनेशन कॅम्पमधून एकून ५१०००/ रुपये जमा करण्यात आले व हा निधी चेक स्वरुपात मा. श्री राजेंद्र (दादा) नागवडे यांच्या हस्ते मनस्वी चे वडील श्री विशाल कोपनर यांना सुपूर्त करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र दादा नागवडे होते त्यांनी महाविदयालयात गरजू लोकांस मदत करण्यासची परंपरा विद्याथ्यांनी पुढे चालू ठेवावी असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी हा कॅम्प सूरु करण्यास परवानगी दिली व विद्यार्थ्यांना प्रेरित केले . या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्थ प्रा.सुरेश रसाळ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. थिटे एस. व्ही., उपाध्यक्ष डॉ. धर्मनाथ काकडे, समन्वयक डॉ. योगेश अहिरे यांनी प्रस्तावना मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. खान आफ्रीज व गौरी झोडगे तर कु. हरल किरण ने आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. बाळासाहेब महारनूर, डॉ. लोहगावकर, डॉ. कर्पे, प्रा. दांडेकर, प्रा. लांडगे, प्रा.वाघमारे, प्रा. सुद्रिक, प्रा.अनपट व इतर सेवक वृंद उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.