पावसासाठी लिंपणगावकरांचे सिद्धेश्वर व लिंगाळेश्वराला साकडे!

By : Polticalface Team ,14-09-2023

पावसासाठी लिंपणगावकरांचे सिद्धेश्वर व लिंगाळेश्वराला साकडे! लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज व श्रीगोंदा फॅक्टरी येथील लिंगाळेश्वर महाराज या ग्रामदेवतेला लिंपणगावकरांनी भरपूर पाऊस पडून धनधान्य मुबलक मिळू द्या, त्यातून पिण्याच्या पाण्याची वाणवा दूर होऊ द्या अशा अंतकरणपूर्वक प्रार्थना लिंपणगावच्या ग्रामस्थांनी या दोन्हीही जागृत देवस्थानला केल्या. दरम्यान पावसाने चार महिन्यापासून पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पीक पेरणीचे व जलसंकट उभे राहिले आहे. खरिपाचा हंगाम यशस्वी होत असताना पावसाने मात्र ओढ दिली. त्यामुळे तालुक्यात भरपूर पाऊस पडून शेतकऱ्यांना आनंदित ठेवा, अशा प्रार्थना लिंपणगावच्या भाविक भक्तांनी या ग्रामदैवतेला केले आहेत. दरम्यान पाऊस पडला नाही तर लिंपणगाव या ऐतिहासिक गावची पार्श्वभूमी अशी की ग्रामस्थ सिद्धेश्वर महाराजांची मूर्ती पालखीमध्ये ठेवून वाजत गाजत श्रीगोंदा फॅक्टरी येथील जागृत देवस्थान श्री लिंगाळेश्वर महाराजांच्या मंदिरात पालखीचे प्रस्थान केले जाते. ही परंपरा लिंपणगावचे दिवंगत ज्येष्ठ ह भ प बापू अण्णा कुरुमकर यांच्या संकल्पनेतून गावात पावसाअभावी जलसंकट निर्माण सिद्धेश्वर महाराजांना वाजत गाजत श्रीगोंदा फॅक्टरी येथील लिंगाळेश्वर महाराजांच्या भेटीसाठी सिद्धेश्वर महाराजांची पालखी काढून हर हर महादेव म्हणत वाजत गाजत काढण्याची प्रथा आहे. तीच प्रथा बुधवारी 13 सप्टेंबर रोजी लिंपणगावच्या सिद्धेश्वर मंदिरातून तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

तेथे पालखीचे लिंगेश्वर मंदिरात प्रस्थान झाल्यानंतर लिंगाळेश्वर मंदिरात लिंगेश्वर महाराजांना धार्मिक पद्धतीने महाआरती करून पुन्हा हर हर महादेव म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात पालखीचे प्रस्थान करून सिद्धेश्वर मंदिरात पुनरागम केले जाते. याप्रसंगी लिंपणगावच्या ग्रामस्थांनी भरपूर पावसासाठी या दोन्हीही जागृत देवस्थानला नतमस्तक होत साकडे घातले आहेत. सद्यस्थितीला दररोज ढगाळ वातावरण तयार होऊन पुन्हा उन्हाची वाढले जाते आहे .वारे देखील सुसाट वाहताना दिसत आहेत. त्यामध्ये आता रब्बी हंगामाचा मोसम सुरू होता असताना पावसाने मात्र पाठ फिरवली आहे. अशा परिस्थितीत पावसाअभावी गाव परिसरातील गावतळी बंधारे पाण्याअभावी कोरडी असून विहिरींनी देखील तळ घाठला आहे . त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांना देखील आता पाणी मिळणे मुश्किल बनले आहे त्यामुळे आता आमच्यावर कृपावृष्टी असावी तुम्हीच आमचे तारणहार आहात मुबलक पाऊस पडू द्या, अशा प्रार्थना देखील उपस्थित भजनी मंडळ ग्रामस्थ व भाविकांनी श्रद्धापूर्वक व्यक्त केले आहे. या पालखी सोहळ्या दरम्यान गावचे ज्येष्ठविधी तज्ञ सुधीर कुलकर्णी पुजारी शिवप्रसाद गुरव यांच्यासह गावातील काही ज्येष्ठ मंडळी यांनी यावेळी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष