सहारा सर्वांगीण विकास संस्थेचा महिलांकडून एकोप्याने रक्षाबंधन साजरा.

By : Polticalface Team ,15-09-2023

सहारा सर्वांगीण विकास संस्थेचा महिलांकडून एकोप्याने रक्षाबंधन  साजरा.

लिंपणगाव (प्रतिनिधी)-- सहारा सर्वांगीण विकास संस्था आणि संविधान गट यांच्या संयुक्त विद्यमाने आज लोणी व्यंकनाथ येथे मिळून साऱ्याजणी या कार्यक्रमात महिलांनीच महिलांना राख्या बांधल्या आणि रक्षाबंधन साजरा केला. या कार्यक्रमामध्ये आपलेपणाची भावना, आपुलकी , नात्यात बांधले जाणे , एकमेकांचे रक्षण करणे. विधवा महिला , परितक्त्या महिला, कुमारी माता, गरीब आणि गरजू महिला या महिलांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असते. एक महिला म्हणून आपल्याला तिचा आदर कसा करता येईल, तिचं प्रमोशन कसं करता येईल, त्यांच्या संवर्धन आणि रक्षणाचे जबाबदारी आज आपण घेत आहोत असे बोलताना सहारा सर्वांगीण विकास संस्थेच्या सचिव छाया भोसले म्हणाल्या आणि पाच गर्भवती महिलांच्या गर्भाचे संरक्षण आणि पाच एकल महिलांना महिलांनीच राख्या बांधल्या आणि संरक्षणाची शाश्वती दिली.
प्रामुख्याने आपण काहीच करू शकत नाही हे मनातून काढून टाका महिलांनी स्वतःच्या आरोग्य कडे लक्ष दिले पाहिजे महिलांकडे खूप चांगले गुण असतात पण समाजाला ते दबगतात .बारा हाडे तुटावीत इतका त्रास सहन करून डिलिव्हरी करणाऱ्या आपण महिला मग सहनशीलता आपल्यात कुठे कमी आहे असे बोलताना डॉ. प्रनोती माई जगताप म्हणाल्या. असे कमी पुरुष असतात की जे स्वतः अंधारात राहून बायकोला प्रकाश देतात. कुंडली बघताना नवरा बायकोची नव्हे तर सासु सुनेची बघा तरच महिला कुटुंबात सुखी राहील. महिला स्वतःच्या पायावर उभे असून सुद्धा आत्महत्या का करतात असा सवाल कार्यक्रमात सुवर्णाताई पाचपुते यांनी केला.
या कार्यक्रम प्रसंगी उर्मिला जठार, सहारा संस्थेच्या विश्वस्त संध्या काकडे, सुनिता उंडे, संगीता घोडेकर, मोनिका गोरखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नीता जठार, अपेक्षा जठार, पूजा साळवे, मीरा शिंदे, प्रमिला काकडे, वैशाली मेरूकर, सुषमा खलाटे, प्रतिभा पवार, शारदा पवार, कल्पना जठार, राणी मदने, सुलभा डांगे, जयश्री बोटे, प्रियंका काकडे, मीरा काकडे , काजल काकडे, सुजाता काकडे, प्रमिला काकडे, शुभांगी बरकडे या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया भोसले तर आभार सहारा संस्थेचे विश्वस्त संध्या काकडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संध्या काकडे, नीता जठार, अनुराधा काकडे, पूजा साळवे, छाया भोसले यांनी प्रयत्न केले अशी माहिती सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भोसले यांनी दिली.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न