रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नातून कोईमतूर-कुर्ला रेल्वे गाडीला एक दिवसासाठी जेऊर येथे मिळाला थांबा

By : Polticalface Team ,15-09-2023

रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नातून कोईमतूर-कुर्ला रेल्वे गाडीला एक दिवसासाठी जेऊर येथे मिळाला थांबा  करमाळा (प्रतिनिधी) रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नातून कोईमतूर-कुर्ला रेल्वे गाडीला एक दिवसासाठी जेऊर येथे मिळाला थांबा मिळाला आणीविद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांची सोय झाली . जेऊर तालुका करमाळा येथील रेल्वे स्टेशन वरून दररोज पुणे येथे शिक्षण,नोकरी व दैनंदिन कामकाजासाठी हैद्राबाद मुंबई एक्सप्रेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. आज 13 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी येणारी ही हैदराबाद मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस उशिराने धावत असल्याने या गाडीने नेहमी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली होती अचानक गाडी लेट असल्याचे कळल्याने पुण्याला परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फारच गैरसोय होणार होती . आरोग्य उपचारासाठी पुणे येथे हॉस्पिटल मध्ये अपॉइंटमेंट असणारे काही रुग्ण या गाडीने जाणार होते, अशावेळी जाणाऱ्या प्रवासातील काही प्रवाशांनी जेऊर येथील प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला व ही अडचण त्यांना सांगितली . प्रवासी संघटनेचे सुहास सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आज एका दिवसासाठी कुर्ला कोईमतुर या गाडीला जेऊर स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन जेऊर रेल्वे स्टेशन प्रबंधक व प्रशासनाने ही सकारात्मक पाऊल उचलत कुर्ला कोईमतुर गाडीला जेऊर येथे थांबवले. या काळात सर्व प्रवाशांना या गाडीने प्रवास करणे शक्य झाले याबद्दल प्रवासी संघटनेचे व या कामी सहकार्य करणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे सर्व प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांनी आभार मानले. आज जेऊर स्टेशन वरून काही विद्यार्थी परीक्षेला पुणे येथे चालले होते काही नोकरदार वर्गाला त्यांना कामावर वेळेवर जायचे होते काही प्रवासी दवाखान्यात चालले होते. आशा प्रवाशांना या थांब्यामुळे मोठा दिलासा मिळाला. वारंवार अशा अडचणी या स्टेशनवर येत असल्याने हुतात्मा एक्सप्रेस ला कायमस्वरूपी या स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी अनेक दिवसापासून रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने केली जात आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी