आदिवासी पारधी समाजातील विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि गुणवत्ता वाढवणार. - संतोष भोसले

By : Polticalface Team ,16-09-2023

आदिवासी पारधी समाजातील विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि गुणवत्ता वाढवणार.
            - संतोष भोसले लिंपणगाव( प्रतिनिधी )--सहारा सर्वांगीण विकास संस्थेच्या वतीने आज लोणी व्यंकनाथ येथे आदिवासी पारधी समाजातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य शिबिर घेण्यात आले. एकूण ३१ विद्यार्थ्यांचे रक्त तपासणी साठी घेण्यात आले आहे. मी स्वतः आदिवासी पारधी समाजातील असल्यामुळे मला या समाजाची गुणवत्ता आणि आरोग्य चांगलेच माहित आहे. विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे आदिवासी पारधी समाजातील मुले वर्गात झोपतात त्यांचं शिकण्यात मन रमत नाही बरेच मुले ताप थंडी असे वेगवेगळे दुखणे अंगावर काढतात हे मला विविध आदिवासी पारधी वस्त्यांना व शाळांना भेटी दिल्यावर समजले. याचा गुणवत्ता व त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होत आहे याची जाणीव झाली जी मुलं भविष्यात पारधी समाजाच परिवर्तन करण्याच काम करणार आहेत आज त्यांचं आरोग्य एकदम खालच्या पातळीवर आहे. त्यांचे भविष्य आज अंधारमय दिसत आहे. याचा समाजावर खूप वाईट परिणाम होत आहे. आणि म्हणून हे थांबावं त्यांचही आरोग्य सुदृढ राहाव त्यांची गुणवत्ता वाढावी , आणि एकही मुलगा शाळा बाह्य राहणार नाही यासाठी आता सहारा सर्वांगीण विकास संस्थेने या मुलांना घडवण्याचा , शिक्षणाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्याची सुरुवात आज लोणी व्यंकनाथ येथे शिबिर घेऊन केली आहे असे बोलताना आदिवासी पारधी समाजाचे नेते संतोष भोसले म्हणाले. या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी व्यंकनाथ आणि श्रीगोंदा येथील रोहित सोळंकी यांनी सहकार्य केले आहे. या विद्यार्थ्यांचा रिपोर्ट हाती आल्यावर त्यांच्यात ज्या कमी आहेत त्या पोषक आहाराद्वारे पूर्ण करण्यात येतील यासाठीच हे आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यावेळी संस्थेच्या सचिव छाया भोसले, अंतूस काळे, पपेश काळे, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. अशी माहिती सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष भोसले यांनी दिली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी