युवक काँग्रेसच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा
By : Polticalface Team ,18-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून श्रीगोंदा शहरातील उपसरपंच चहा या हॉटेलमध्ये चहा बनवून व वेटर म्हणून काम करत ग्राहकांना चहा,नाष्टा यांची सेवा देण्यात आली.नरेंद्र मोदी सरकारची चुकीची धोरणे, दरवर्षी युवकांना दोन कोटी नोकऱ्या देण्याचा चुनावी जुमला यांचा उपरोधिक पद्धतीने निषेध नोंदविण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने उपसरपंच चहा या हॉटेलमध्ये आचारी,वेटर म्हणून काम करण्यात आले.सरकारकडून रोजगार मेळाव्यांचा उपक्रम नाही, कौशल्य विकसित करण्यासाठी उपक्रम नाहीत,नोकरीच्या भरतीचा आराखडा नाही,बँकांच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज देणारी शाश्वत योजना नाही त्यामुळे युवक भविष्याची चिंता करत नैराश्यात जात आहेत,दिशाहीन झाले आहेत.भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडियाचे काम करणारे ट्रोलिंग आर्मी म्हणून काम करताना सोशल मीडियावर धार्मिक द्वेष पसरवत आहेत आणि या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण नकळत सुशिक्षित बेरोजगार होत आहोत याची जाणीव होत नाही हे नरेंद्र मोदींचे यश आहे.नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वात काम करणारे महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस यांच्या सरकारच्या अपयशामुळे महाराष्ट्रातील वेदांता-फॉक्सकॉन सारखे प्रकल्प गुजरातच्या निवडणूकीपुर्वी गुजरातमध्ये वळवण्यात आले त्यामुळे विशेषतः महाराष्ट्रातील युवकांनी भारतीय जनता पक्षाला धडा शिकवण्याची गरज आलेली आहे.अंधाराने अंधार दूर होत त्यासाठी उजेड हवा,तिरस्काराने तिरस्कार दूर होत नाही त्यासाठी प्रेम हवं आणि आजच्या घडीला धार्मिक विद्वेष पसरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून युवकांची माथी भडकवली जात आहेत त्यामुळे या द्वेषाच्या वातावरणात प्रेमाचे दुकान उघडलेल्या राहुल गांधी यांचा युवकांना आधार वाटत आहे.काँग्रेसचा हात युवकांच्या पाठीशी नेहमी असेल ही ग्वाही युवक काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात आली.महाराष्ट्रातील आणि देशातील विरोधकांवर दाखल झालेली सीबीआय आणि ईडीची प्रकरणे यांचा अहवाल लक्षात घेतला तर ९५ टक्के सीबीआय केसेस या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आहेत तर ईडीची प्रकरणे खरी असण्याचा दर ०.०५ टक्के एवढा आहे त्यामुळे युवक भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाहीवादी वागणूकीला नष्ट करुन काँग्रेसचे सरकार पुन्हा देशात आणेल हा विश्वास काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे स्वरूप, संदर्भ मांडताना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी देशातील नरेंद्र मोदी सरकारचा निषेध केला.याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष निशांत लोखंडे, रुपेश काळेवाघ, कांतीलाल कोकाटे यांची भाषणे झाली.या उपरोधिक आंदोलनाला युवक तालुकाध्यक्ष विकास काळे, नितीन लोखंडे, धीरज खेतमाळीस,भूषण शेळके,मयुर क्षिरसागर,सतिष नवले,प्रशांत साबळे व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.