लिंपणगावचे भूषण सोपानराव आण्णा कुरुमकर काळाच्या पडद्याआड
By : Polticalface Team ,19-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सोपानराव रोहिदास कुरुमकर वय 70 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते तालुक्यात अण्णा या नावाने परिचित होते. कै सोपानराव कुरुमकर हे धाडसी कार्यकर्ता म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. ते काही वर्ष राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अनेक वर्ष अण्णांनी नागवडे कारखान्यात सेवा केली. अत्यंत बिकट परिस्थितीतून आपल्या कुटुंबाची प्रगती करण्यात त्यांनी मोठे परिश्रम घेतले. पूर्वी नागवडे कारखान्यात सेवा करत असताना कुटुंबाच्या प्रगतीसाठी मंडप डेकोरेशन हा व्यवसाय हा व्यवसाय नावारूपाला आणत जवळपास 25 वर्ष या व्यवसायाचे उत्तम प्रकारे काम पाहिले. त्यातून त्यांची संपूर्ण तालुक्यात कुरुमकर मंडप लाईट डेकोरेशन हे नाव त्यांनी तालुक्यात उत्कृष्ट कामाच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटविला.
सोपानराव आण्णा कुरुमकर यांनी काही वर्षे लिंपणगाव ग्रामपंचायतचे त्यांचे बंधू नामदेवराव कुरुमकर हे सरपंच असताना ग्रामपंचायत प्रशासनाचे उत्तम प्रकारे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. त्याकाळी गावच्या विकासात मोठी भर पडली. एवढ्यावरच अण्णा थांबले नाही तर तात्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत दिलीप गांधी यांच्या खासदार निधीतून सिद्धेश्वर मंगल कार्यालय उभारण्यात अण्णांचा मोठा सिंहाचा वाटा होता. याबरोबरच गावच्या जडणघडणीमध्ये देखील अण्णांनी मोठे योगदान दिले सर्वसामान्यांसाठी सोपान अण्णा हे गावचे छोटे कोर्ट म्हणून त्यांची ओळख होती. गोरगरिबांची किरकोळ वादावादी हे श्रीगोंदा पोलीस स्टेशन पुढे न जाता गावातच योग्य तोडगा काढून नेहमीच सामांजस्याची भूमिका घेण्यात अण्णांचा मोठा पुढाकार होता. त्यामुळे सर्वसामान्यांचे आणि अण्णांचे मोठे ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले होते. गावच्या यात्रोत्सवामध्ये अण्णांचा नेहमीच मोठा सहभागा असायचा गावची ग्रामपंचायत ताब्यात असताना पाच वर्ष अण्णांनी यात्रा उत्सवाला गालबोट न लागता शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा उत्सव पार पाडण्यात अण्णांचा मोठा सिंहाचा वाटा होता. अण्णा हे करारी आणि जिद्दी व्यक्तिमत्व होते. सत्य आणि निर्भीड बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून अण्णांकडे संपूर्ण तालुका पाहत असे. कोणतीही निवडणूक असो ज्या पक्षात स्थान आहे त्या पक्षाच्या राजकीय दृष्ट्या निष्ठेन त्या नेत्या बरोबर आपले सलोख्याचे संबंध ठेवले. असे हे व्यक्तिमत्व अचानक सोमवारी 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दौंड येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या पश्चात पत्नी नागवडे कारखान्याच्या माजी संचालिका नंदाबाई कुरुमकर ,दोन मुले, एक मुलगी, बंधू माजी सरपंच नामदेवराव कुरुमकर, सुना, नातवंडे, चार बहिणी असा मोठा कौटुंबिक परिवार असून, ते खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष प्रवीण कुरुमकर यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने लिंपणगाव परिसरावर मोठा दुःखाचा डोंगर पसरला असून, अनेक मान्यवरांनी अंत्यविधी समय भावपूर्ण श्रद्धाजली व्यक्त केली. यावेळी गावच्या पंचक्रोशी व तालुक्यातील नेते मंडळींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अण्णांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अंत्यविधी प्रसंगी सूत्रसंचालन पंचायत समितीचे माजी सदस्य काकासाहेब रोडे यांनी श्रद्धांजली अर्पण करत सूत्रसंचालन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.