नेचर क्लबतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे पथनाट्यातून संदेश शाळेतील मुलांना दिले.

By : Polticalface Team ,20-09-2023

नेचर क्लबतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे पथनाट्यातून संदेश शाळेतील मुलांना दिले. लिंपणगाव (प्रतिनिधी) श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे नेचर क्लब ची स्थापना करण्यात आली. या अनुषंगाने नेचर क्लब विविध पर्यावरण आणि सामाजिक समस्यांवर काम करत आहे. येणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोणत्या प्रकारची गणेशमूर्ती वापरावी आणि सजावटीसाठी कोणते साहित्य वापरावे, याचे भान लोकांनी ठेवावे. जेणेकरून जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण कमी करता येईल. हा संदेश लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेचर क्लबच्या विद्यार्थ्यांनी महादाजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा, अहमदनगर येथे पथनाट्य व नृत्य सादर केले. या पथनाट्याद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फायदे आणि गणेशोत्सवामुळे होणारे प्रदूषणाचे तोटे स्पष्ट केले आहेत. यावेळी प्रास्ताविकात नेचर क्लबचे समन्वयक डॉ. अहिरे वाय. आर. सर यांनी नेचर क्लब ची संकल्पना उपस्थितांनी मांडली. सामाजिक व पर्यावरण जनजागृतीचे कार्य करण्यासाठी श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एस. जी. सुर्यवंशी हे नेहमीच अग्रेसर राहून विद्यार्थ्यांना नियमित सहकार्य व मार्गदर्शन करतात, असे डॉ. अहिरे वाय. आर. यानी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादाजी शिंदे विद्यालयाचे शिक्षक श्री लोखंडे व्ही. यानी केले. नेचर क्लबच्या अध्यक्षा कुमारी अफरोन खान यांनी पथनाट्याची पटकथा लिहिली. यावेळी विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच साळुंके सिद्धी, घोडेकर स्नेहल, बागल पायल, कोळपे दिव्ये, डाळिंबे वैभवी, भोईटे सुहानी, निंबाळकर सुहानी, चोर वैष्णव, मुस्कान शेख, शिंदे ओंकार, वागस्कर रुषी, शेळके रुतुजा, झांझाडे रुषिकेश, भगत सनी, बोनघे नीता, बोनसुदे प्रणव, ढवळे प्रतीक्षा, गायकवाड विशाल, गजरे अभिजीत, कोकाटे सुदर्शन, कोकाटे गौरव, कुरुमकर यश, माने चैतन्य, आदींनी पथनाट्य सादर केले. तर कुमार किरण हाराळ ने शाळेच्या मुख्याध्यापक श्री. बोडखे सर, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे यांचे विशेष आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी