श्रीगोंदा तालुक्यात गौरी गणपती बाप्पांच्या आगमनानंतर सर्वत्र संततधार पाऊस,
शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची सरासरी 52.5 नोंद
By : Polticalface Team ,23-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यात 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मेघगर्जनेसह पावसाने प्रारंभ केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान गेल्या तीन साडेतीन महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली शेतकऱ्यांनी मात्र कमी ओलीवर खरीप हंगामाच्या पेरण्या केल्या. त्याची उगवण देखील चांगली झाली. परंतु पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाचे पिके धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली असताना अचानक पावसाने खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यातच जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामा विषयी अपेक्षा वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचे म्हणण्यानुसार उशिरा का? होईना परंतु गौरी गणरायाचे आगमन आणि पावसाला सुरुवात हा आमच्या दृष्टीने दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना दिसत होत्या. दरम्यान पावसाळा सुरू होऊन जवळपास तीेन-साडेतीन महिने उलटले. परंतु उन्हाची तीव्रता वाढवून त्यामध्ये उकाड्याचे प्रमाण अधिक वाढल्याने त्याचा परिणाम पिकांबरोबर मानवी जीवनावर देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसत होता. सर्वत्र पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत असतानाच जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही असे चित्र चालू वर्षी निर्माण होते.शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण निर्मांण झाले. श्रीगोंदा तालुका हा संत महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका समजला जातो. त्यामध्ये या महान संत महापुरुषांवर देखील येथील जनतेची अपार श्रद्धा आहे. संकट कालीन परिस्थितीत निश्चितपणे भगवांत धावून येईल अपेक्षा देखील शेतकऱ्यांना दृढ होती. ती तंतोतंत खरी ठरली. दरम्यान गावोगावी पवित्र महिना समजला जाणारा श्रावण शुद्ध या महिन्यांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळे भरपूर पावसासाठी यज्ञ आयोजित केले जातात. त्यामुळे हा तालुका निश्चितपणे धार्मिक क्षेत्रात अग्रेसर समजला जातो. असो, गौरी गणरायांचे आगमन झाल्यानंतर तालुक्यात सर्वत्र अचानक पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दाटून आले.
एकीकडे पावसाने पाठ फिरवली. दुसरीकडे मात्र पाऊस पाणी नसल्याने ओढे, नाले, बंधारे, गावतळी पाण्याअभावी कोरडे पडले. सर्वत्र पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा देखील प्रश्न गंभीर बनला. 1972 च्या दुष्काळाची सर्वांनाच जाणीव होताना दिसून आली. विशेष म्हणजे श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड, भीमा नदीच्या पाणी पातळीत देखील कमालीची घट झाली. त्यामुळे चालू वर्षी दुष्काळाचे सावट पडणार अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच पावसाने मात्र अचानक संतधार सुरुवात केल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला दिसतोय. कारण गेल्या वर्षी अतिवृष्टीने मोठे थैमान घातले. हातात तोंडाशी आलेली खरीपाची पिके काही क्षणात गेली. त्यावेळी मात्र शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. राज्य सरकारने गेल्या वर्षी खरीप हंगामाच्या नुकसानीचे पंचनामे केले. यातून काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले. परंतु अनेक अल्पभूधारक शेतकरी या अनुदानापासून अद्यापही वंचित आहेत. दररोज शासन दरबारी या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. अशी स्थिती असताना आता पुढे रब्बी हंगामाचा मौसम सुरू होणार आहे. पावसाने अशीच साथ दिली, तरच रब्बी हंगाम यशस्वी होऊ शकतो. अन्यथा रब्बी हंगामाचे भवितव्य अंधकारमय असणार आहे. असे शेतकरी सांगतात.
दरम्यान गुरुवारी 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रीगोंदा तालुक्यात पावसाची सरासरी 52.5 इतकी नोंद झाली आहे. त्यामध्ये तालुक्यात आठ कृषी मंडल असून, सरासरी मंडल प्रमाणे पावसाची नोंद पुढीलप्रमाणे श्रीगोंदा 36.3, काष्टी 32.8, मांडवगण 46.5, बेलवंडी 71.8, पेडगाव 15.5, चिंभळा 36.00, देवदैठण ३४. ००, कोळगाव 114.8 इतक्या पावसाची सरासरी नोंद झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्री सुपेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तालुक्यात बेलवंडी आणि कोळगाव मंडल कार्यक्षेत्र वगळता अन्यमंडल क्षेत्रात पावसाची अत्यल्प पर्जन्यमान दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित मंडळामध्ये अद्यापही मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा असून, वातावरण अद्यापही ढगाळ असून, उकाड्याचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये जोरदार पावसाची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. एकूणच 21 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने मात्र उभ्या खरीप हंगामांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.