मढेवडगाव सेवा सोसायटी सभासदांना 12 टक्के लाभांश वाटप करणार-प्रमोद शिंदे

By : Polticalface Team ,25-09-2023

मढेवडगाव सेवा सोसायटी सभासदांना 12 टक्के लाभांश वाटप करणार-प्रमोद शिंदे लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मढेवडगाव सेवा सहकारी संस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. अध्यक्षीय भाषणांमधून बोलताना प्रमोद शिंदे यांनी संस्थेचे कर्ज वाटप, कर्ज वसुली त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती बाबत सभासदांना माहिती देत असताना भविष्यामध्ये संस्थेचे नवीन इमारत बांधून त्यामध्ये नवनवीन व्यवसाय चालू करून गावातील सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संस्थेचे संचालक मंडळ काम करत असून त्यामुळे निश्चितच गावाच्या वैभवामध्ये भर पडणार आहे. त्याचबरोबर संस्थेची वाढत चाललेली थकबाकी विषयी चिंता व्यक्त करताना सभासदांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले अनेक सभासदांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत असताना संस्थेने वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाचे आभार मानले. संस्थेचे मार्गदर्शक नागवडे कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे यांनी सहकारी संस्थेमध्ये काम करत असताना अत्यंत काटकसरीने काम करून संस्था ही शेतकरी सभासदां च्या हिताची कामधेनू आहे त्यामुळे संस्थेमध्ये कोणाचे अडवणूक न करता सभासद हित डोळ्यासमोर ठेवूनच कारभार करण्याचा सल्ला संचालक मंडळाला दिला. याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन भगवानराव कुरुमकर संचालक काकासाहेब मांडे, भीमराव फरकांडे, बापूसाहेब वाबळे, प्रकाश उंडे, विठ्ठलराव वाबळे, मानसिंग मांडे, दत्तात्रेय झुंजरुक, शरद शिंदे, संदीप उंडे, नितीन रासकर, वसंत साळवे, अशोक शिंदे, सभासद बाळासाहेब मांडे, संतोषराव गुंड, बबनराव उंडे, पंडितराव वाबळे, रावसाहेब जाधव जयसिंग मांडे, युवक अध्यक्ष स्मितल वाबळे, फुलसिंग मांडे, राजेंद्र उंडे, नंदू साळवे, अमोल गाढवे, मधुकर शिंदे, हनुमंत झिटे, योगेश मांडे, राहुल साळवे, निलेश गोरे, बापूराव मांडे, साहेबराव मांडे, ज्ञानदेव माऊली उंडे बबनराव गोरे, निळकंठ उंडे आदी सभासद उपस्थित होते. सर्व सभासदांचे आभार संस्थेचे सचिव धोत्रे भाऊसाहेब यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी