लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिर राज्य संरक्षित परिसरात अनाधिकृत बांधकामा विरोधात ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
By : Polticalface Team ,25-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिर राज्य संरक्षित स्मारक परिसरात बांधकाम सुरू असून सदरचे बांधकाम पुरातत्त्व विभागाने वेळोवेळी केलेल्या सूचनेनुसार होत नाही पुरातत्त्व विभागाने मंदिर परिसरात सुरू असलेल्या अनाधिकृत बांधकामावर ठपका ठेवून देखील ग्राम विकास अधिकारी हे ग्रामपंचायतचा कारभार पाहताना मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. याउलट पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितावर गुन्हे दाखल करावेत गावातील विकास कामासंदर्भात मागितलेली कोणतीही माहिती ग्रामविकास अधिकारी व पदाधिकारी हे देत नाहीत. त्यामुळे त्या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. यासाठी आपण श्रीगोंदा तहसील कार्यासमोर 25 सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे युवक कार्यकर्ते निलेश कुरुमकर यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गटविकास अधिकारी व संबंधितांना दिलेल्या निवेदनात उपोषण करते निलेश कुरुमकर व सामाजिक कार्यकर्ते किरण कुरुमकर यांनी म्हटले आहे की, 15 ऑगस्टची महिला ग्रामसभा देखील घेतलेली नाही. त्याचप्रमाणे जनरल ग्रामसभेमध्ये मागील विषय आराखडा असे कुठलेही प्रकारचे वाचन न करता श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात चालू असलेल्या कामाबाबत पुरातन विभागाच्या वाचन करण्यात आले, त्या वाचनावरती झालेले सर्व विषय प्रोसिडिंगला न घेता चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ठराव देण्याचे काम केले. आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रोसिडिंग मागितले असताना त्यांना प्रोसिडिंग देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याचप्रमाणे जे विषय ग्रामसभेत झाले ते पूर्ण विषय प्रोसिडिंगला न घेता ग्रामस्थांनी सुचवलेल्या विरोधात ठराव घेऊन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दिले गेले; असे सांगून या निवेदनात आणखी पुढे म्हटले आहे की श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात चालू असलेल्या कामकाजाबाबत वारंवार ग्रामपंचायतला कारवाई करण्याचे आदेश देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई ग्रामविकास अधिकारी करत नाहीत. त्या अनुषंगाने सदर ग्रामविकास अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करण्यात यावे; निलंबन न झाल्यास दि. 25/9/2023 रोजी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे आमरण उपोषण करण्यात आले आहे . उपोषण करते निलेश कुरुमकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून, पुढील सर्वश्री जबाबदारी ही प्रशासनाची राहील निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक आदिना पाठविण्यात आल्या असून या निवेदनावर 150 ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.