लिंपणगावच्या ग्रामस्थांचे दुसऱ्या दिवशीही तहसील कार्यालयासमोर उपोषण कायम, संबंधित दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, उपोषणकर्त्यांचा इशारा

By : Polticalface Team ,26-09-2023

लिंपणगावच्या ग्रामस्थांचे दुसऱ्या दिवशीही तहसील कार्यालयासमोर उपोषण कायम,

     संबंधित दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, उपोषणकर्त्यांचा इशारा श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिर अनाधिकृत बांधकाम संदर्भात तसेच ग्रामविकास अधिकाऱ्याकडून गावच्या विविध विकास कामांची माहिती मागूनही माहिती मिळत नाही. ग्रामसभेमध्ये झालेले विषय प्रोसिडिंग घेतले जात नाहीत. ग्रामस्थांनी सुचवलेले कामांवर निर्णय घेतला जात नाही. सदस्यांच्या सूचनेनुसार चुकीचे ठराव घेऊन निष्कृष्ट दर्जाची कामे करून कामांची बिले काढली जात आहेत. महिला ग्रामसभा घेण्यास कसूर करणे यासह अन्य प्रमुख मागण्यासाठी लिंपणगावचे युवक कार्यकर्ते निलेश कुरुमकर व किरण कुरुमकर यांनी 25 सप्टेंबर पासून श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी उपोषणाचा दुसरा दिवस असल्याने जोपर्यंत संबंधितावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण उपोषणावर उपोषणकर्ते निलेश कुरुमकर व किरण कुरुमकर अन्य ग्रामस्थांनी यावेळी घेतला असल्याचे सांगितले.
सोमवारी 25 सप्टेंबर रोजी उपोषणा दरम्यान भाजपा नेत्या सुवर्णा पाचपुते, बी आर एस एस चे टिळक भोस, अनिल ठवाळ, सौ प्रणोती जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला.
उपोषण स्थळी श्रीगोंद्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे व गटविकास अधिकारी राणीताई फराटे आदींनी संबंधित पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो निसफळ ठरला.
दरम्यान राणीताई न उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे मौजे लिंपणगाव येथील प्राचीन कालीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर या राज्य संरक्षित तीर्थक्षेत्र क वर्ग मंदिर परिसरामध्ये अनाधिकृतपणे खोदकाम व बांधकाम करणाऱ्यांवर पुरातत्त्व विभागाने कायदेशीर कारवाईी का? केली नाही? व ती तात्काळ करावी, मंदिर परिसरात पुरातत्व विभागाने लावलेला नाम फलक व मंदिर परिसरातील झाडे रात्रीच्या वेळी तोडली ही बाब पुरातत्व विभागाला माहिती असूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई व गुन्हे का? नोंदवले नाहीत? ते नोंदवावेत. पुरातत्व विभागाने लिंपणगाव ग्रामपंचायतला वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील संबंधित ठेकेदार व ग्रामपंचायत पदाधिकारी हे दखल घेत नाहीत संबंधितांवर योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. तसेच मंदिर परिसरात जे उत्खनन व विनापरवाना झालेले काम सर्व संबंधित व्यक्तीकडून काढून घेण्यात यावे.
तातडीने पुरातन विभागाची परवानगी घेऊन सदर कामाचे नव्याने प्लॅन इस्टिमेट तयार करावे व पुरातन विभागाच्या मार्गदर्शनाने काम करण्याचे आदेश देण्यात यावेत, सिद्धेश्वर मंदिर परिसरातील अनाधिकृत कामाची बिल काढले असल्यास ते तात्काळ ग्रामपंचायतला वर्ग करावे. इत्यादी उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत. आता पुरातत्व विभाग श्रीगोंद्याचे तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष