कर्मयोगी गोविंद बापूंच्या आदर्श विचाराचा वारसा पतसंस्था पुढे चालवीत आहे,,,,, प्राध्यापक अर्जुनराव सरक

By : Polticalface Team ,26-09-2023

कर्मयोगी गोविंद बापूंच्या आदर्श  विचाराचा वारसा पतसंस्था पुढे चालवीत आहे,,,,, प्राध्यापक अर्जुनराव सरक करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 कर्मयोगी गोविंद बापूंच्या आदर्शवत विचाराचा वारसा पतसंस्था पुढे चालवत आहे असे प्रतिपादन प्रा अर्जुन सरक प्रवक्ते यांनी केले.जेऊर ता. करमाळा येथील कर्मयोगी गोविंदबापू पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन संजयकुमार गादिया होते तर व्यासपीठावर पाटील गटाचे मार्गदर्शक तथा भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जुनराव सरक,व्हॉईस चेअरमन मुबारक शेख,संचालक सुनील शहाणे, नवीन कुमार दोशी, कांबळे सर, शितलकुमार दोशी, अर्जुन पांढरे, संस्था सचिव अनिल पाटील,लोकनेते नारायण पाटील पतसंस्था सचिव विलास ठोकळ सर, माजी सरपंच भास्कर कांडेकर, सोसायटी अध्यक्ष महेश कांडेकर, माजी उपसरपंच धनाजी शिरस्कर, साडे येथील शेलार सर, करमाळा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था सचिव पांडुरंग वाघमारे सर, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस कर्मयोगी गोविंद बापू पाटील व मोतीकाका गादीया यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अहवाल वाचन व प्रास्तविक संस्था व्यवस्थापक शांताराम सुतार यांनी केले. यावेळी त्यांनी पतसंस्थेचा लेखाजोखा सभासदां समोर मांडला.तर विलासराव ठोकळ यांनी पतसंस्था कशी चालवावी याबद्दल मार्गदर्शन केले चेअरमन संजय गादिया यांनी पतसंस्थेत ध कोटी हून अधिक ठेव असल्याचे सांगत पाच कोटी हून अधिक कर्जवाटप झाल्याचे सांगितले. तसेच पुढील आर्थिक वर्षात पतसंस्थेत पंधरा कोटी हून अधिक ठेव असेल व कर्जवाटप प्रमाण वाढवले जाईल. सभासदांना चांगला लाभांश व ठेवीदारांना चांगले व्याज देऊन छोट्या व्यावसायिकांना कमी व्याजदरात तात्काळ कर्ज देण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले. यावेळी विलासराव ठोकळ, प्रा अर्जुनराव सरक, सुनील तळेकर यांनी विचार मांडले. सूत्रसंचलन अंगद पठाडे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष मुबारक शेख यांनी मानले. यावेळी उपस्थित सभासदातून पाच सभासदांना लकी ड्रॉ काढून उपस्थिती बद्दल आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच सभासदांना सोलापुरी चादर भेट देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिपिक सोमनाथ वाघमोडे,कुलदीप जाधव, अतुल गदिया यांनी परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी