दिवंगत सोपानराव अण्णा कुरुमकर यांच्या दशक्रिया विधी निमित्त हजारोंच्या उपस्थितीत अण्णांना अखेरचा निरोप

By : Polticalface Team ,27-09-2023

दिवंगत सोपानराव अण्णा कुरुमकर यांच्या दशक्रिया विधी निमित्त हजारोंच्या उपस्थितीत अण्णांना अखेरचा निरोप लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील जनसामान्यांचे आधारवड दिवंगत सोपानराव अण्णा कुरुमकर यांचे नुकतेच 18 सप्टेंबर रोजी निधन झाले. बुधवारी 27 सप्टेंबर रोजीअण्णांचा श्रीगोंदा फॅक्टरी येथील ग्रामदैवत लिंगाळेश्वर महाराजांच्या प्रांगणात दशक्रिया विधीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ह भ प संजय महाराज गिरमकर यांनी त्यांच्या समाजकार्याच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णांच्या सहवासातील अनेक सर्वसामान्य कार्यकर्ता, मित्रपरिवार नातेवाईक जिल्ह्यातून आलेले स्नेही मित्र आदींनी अण्णांना दशक्रिया विधी निमित्त अखेरचा भावपूर्ण निरोप दिला.

याप्रसंगी लिंपणगाव पंचक्रोशीतील आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा भावपूर्ण निरोप देताना अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना देखील गहिवरून आले. अण्णा तुम्ही पुन्हा पुनर्जन्म घ्या, तुम्हीच आमचे तारणहार व आधार होता. तुमच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत. अशा अशा शब्दात भावना व्यक्त करत अनेक जनसामान्यातील या नेत्याला दशक्रिया विधी निमित्त अश्रू अनावर झाले.

अण्णांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात सर्वसामान्यांना मोठा आधार दिला. एक छोटे कोर्ट म्हणून आपली भूमिका पार पाडताना अण्णांची भूमिका ही एक सामंजस्याची व गावच्या हिताची होती. लिंपणगाव पंचक्रोशीतील असा नेता होणे नाही अशा भावनिक प्रतिक्रिया श्रद्धांजली सभेतून व्यक्त होताना दिसल्या. त्यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले.

या दशक्रिया विधी प्रसंगी बीआरएसचे नेते घनश्याम आण्णा शेलार, माजी आमदार राहुल जगताप, युवा नेते दिग्विजय नागवडे, परिक्रमा संकुलनाचे अध्यक्ष प्रतिभाताई पाचपुते, गणपतराव काकडे, दिनकरराव पंधरकर, सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे आजी-माजी संचालक, तालुका व जिल्ह्यातील असंख्य नेते मंडळी ह भ प संजय महाराज गिरमकर ह भ प मानसिंग महाराज इथापे आदींसह अन्य कार्यकर्त्यांनी यावेळी अण्णांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या जीवनशैलीवर प्रकाश ज्योत टाकला. यावेळी अनेकांना गहिवरून देखील आले.

सूत्रसंचालन पंचायत समितीचे माजी सदस्य काकासाहेब रोडे यांनी देखील त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत श्रद्धांजली अर्पण केली.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी