लिंपणगाव सेवा सोसायटी सभासदांना 12 टक्के लाभांश वाटप करणार -चेअरमन रवींद्र खळदकर

By : Polticalface Team ,27-09-2023

लिंपणगाव सेवा सोसायटी सभासदांना 12 टक्के लाभांश वाटप करणार -चेअरमन रवींद्र खळदकर लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समस्या जाणाऱ्या लिंपणगाव सेवा संस्थेची 32 वी सर्वसाधारण सभा 27 सप्टेंबर रोजी संस्थेचे चेअरमन रवींद्र खळदकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी अहवाल सालात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत संस्थेचे सचिव दत्तात्रय खळदकर यांनी केले.

याप्रसंगी या वार्षिक सर्वसाधारण सभेत एक ते दहा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. मागील आर्थिक वर्ष 2022 -23 या वर्षात संस्थेला 20 लाख 53 हजार 706 रुपये इतका नफा झाला. त्यामुळे सभासदांना 12% ने लाभांश वाटप करणार असल्याचे संस्थेचे चेअरमन रवींद्र खळदकर यांनी सांगितले. या वार्षिक सर्वसाधारण सभेत भविष्यात संस्थेची नूतन इमारत बांधकाम करण्याचे धोरण संचालक मंडळापुढे आहे. त्याबरोबरच सभासदांनी संस्थेकडून घेतलेले कर्ज तात्काळ भरून संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन रविंद्र खळतकर यांनी केले. संस्थेमार्फत खत विभाग चालवला जातो. परंतु अनेक सभासद मात्र खाजगी कृषी सेवा केंद्रातून खते खरेदी करतात ते योग्य नाही त्यामुळे खते शिल्लक राहतात असे सांगून ते पुढे म्हणाले की सभासदांनी संस्थेच्या खत विभागातूनच खते खरेदी करावीत अशा सूचना मा चेअरमन अरविंद कुरुमकर यांनी यावेळी केल्या.

या सर्वसाधारण सभेत बँक, साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ इत्यादी निवडणुकी दरम्यान संस्थेचा ठराव देताना विशेष सर्वसाधारण सभा घेऊन ठराव देणे, धर्मादाय फंड, तज्ञ संचालक, संस्थेच्या मालकीची मोकळी जागेचे मोजमाप करणे, शिल्लक रासायनिक खते, सभासदांचे थकीत कर्ज इत्यादी विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी या चर्चेत अवधूत भोईटे, माजी चेअरमन अरविंद कुरुमकर, नागवडे कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ कुरुमकर, दीपक कुरुमकर, मसुदेव कुसाळकर, सतीश भगत आदींनी चर्चेत सहभाग घेत संस्था व सभासदांचे हितासाठी मौलिक सूचना यावेळी केल्या. सभासदांनी विचारलेल्या मागील अहवाल सालात झालेल्या विषयासंदर्भात संस्थेचे सचिव दत्तात्रय खळदकर यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.

या सर्वसाधारण सभेस माजी सरपंच बापूराव रेवगे, रावसाहेब कुरुमकर, माजी चेअरमन दादासाहेब कुरुमकर, पत्रकार नंदकुमार कुरुमकर, माजी चेअरमन लक्ष्मण भोईटे, सुदाम कुरुमकर, संभाजी कुरुमकर, सुभाषराव कुरुमकर, राजेंद्र कुरुमकर, संभाजी लष्करे, अशोक होले, संपत होले, रामभाऊ टुले, ईश्वर रेवगे, रमेश, ओहोळ, सखाराम निंबाळकर, सुदामराव भगत आदी संचालकांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन करत आभार संस्थेचे संचालक दादासाहेब कुरुमकर यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.