लिंपणगाव ग्रामस्थांचे तिसऱ्या दिवशीही उपोषण कायम,
पुरातत्त्व विभाग समाधानकारक लेखी देत नाही तोपर्यंत उपोषणावर उपोषणकर्ते ठाम
By : Polticalface Team ,27-09-2023
श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिर संरक्षित अनाधिकृत बांधकाम ग्रामपंचायत कडून विकास कामा संदर्भात समाधानकारक उत्तर न मिळणे, महिला ग्रामसभा घेण्यात ग्रामविकास अधिकाऱ्याकडून कसूर करणे या व अन्य मागण्यासाठी लिंपणगाव चे युवक कार्यकर्ते किरण कुरूमकर व निलेश कुरुमकर यांच्यासह ग्रामस्थांनी श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर 25 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस असूनही, तालुका प्रशासन व पुरातत्व विभागाकडून अद्याप पर्यंत समाधानकारक देखील आश्वासन न मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तिसऱ्या दिवशीही कायम उपोषणावर ठाम राहिले आहेत.
पत्रकारांशी बोलताना उपोषण करते किरण कुरुमकर यांनी म्हटले आहे की, पुरातत्व विभाग लिंपणगावच्या सिद्धेश्वर मंदिर संरक्षित अनाधिकृत बांधकामा संदर्भात समाधानकारक देखील देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत. लेखी आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता देखील तत्परतेने झाली पाहिजे असे किरण कुरुमकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान उपोषणकर्त्यांच्या तिसऱ्या दिवशी बी आर एसचे नेते घनश्याम अण्णा शेलार, मुंढेकरवाडी सेवा संस्थेचे मा चेअरमन सुभाष जाधव, नागवडे कारखान्याचे माजी संचालक अशोकराव रोडे, शिक्षक नेते पी.जी दरेकर आदींनी उपोषण स्थळी भेट दिली.
या प्रश्न पुरातत्व विभागाच्या नाशिक येथील अधिकारी श्रीमती आरे मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, उपोषणकर्त्यांना आम्ही सायंकाळपर्यंत लेखी आश्वासन देणार आहोत. कर्मचारी संख्या अपुरी असल्याने उपोषणकर्त्यांची भेट घेणे शक्य होत नाही. त्यामुळे योग्य ते लेखी आश्वासन देणार असल्याचे श्रीमती आरे मॅडम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता पुरातत्त्व विभागाच्या समाधानकारक उत्तरानंतरच उपोषण करते आपले आमरण उपोषण मागे घेतात की? उपोषणावर ठाम राहतात. हे आता लवकरच समजेल.
वाचक क्रमांक :