अखेर पुरातत्व विभागाच्या लेखी आश्वासनानंतर लिंपणगावच्या ग्रामस्थांचे उपोषण मागे
सहा ऑक्टोबरला प्रत्यक्ष मंदिर बांधकाम पाहणी करून संबंधित दोषींवर त्याच दिवशी कारवाई करणार- आरती आळे
By : Polticalface Team ,28-09-2023
श्रीगोंदा (प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर या राज्य संरक्षित स्मारक परिसरात अनाधिकृत बांधकाम व ग्रामपंचायतच्या विविध विकास कामासंदर्भात ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून वेळेत विकास कामांची माहिती उपलब्ध होत नसल्याकारणाने ग्रामविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी व अन्य मागण्यासंदर्भात लिंपणगावचे युवक कार्यकर्ते किरण कुरुमकर व निलेश कुरुमकर यांनी 25 सप्टेंबर असून तीन दिवस श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी सात वाजता नाशिक येथील पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे यांनी ई-मेल द्वारे उपोषणकर्त्यांच्या सहा मुद्द्यांसंदर्भात समाधानकारक लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते किरण कुरुमकर व निलेश कुरुमकर यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.
दरम्यान उपोषणकर्त्यांच्या मागण्या रास्त असल्याने त्या संदर्भात राष्ट्र निर्माण दल अध्यक्ष भालचंद्र सावंत व बी आर एस एस चे टिळक भोस यांनी मुंबई येथील पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी योग्य तो संपर्क साधून उपोषणकर्त्यांच्या मागण्या व भावना दूरध्वनीद्वारे कळविल्या. त्यानंतर मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत नाशिकच्या सहाय्यक संचालक आरती आळे, श्रीगोंद्याचे तहसीलदार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी इत्यादींना दूरध्वनीच्या लाईनद्वारे एकत्र आणून उपोषणकर्त्यांच्या मागण्या संदर्भात दिरंगाई न करता तात्काळ पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या या मंदिर संरक्षित स्मारक तक्रारींची बाबत नियमानुसार लेखी आश्वासन देऊन, सिद्धेश्वर मंदिर संरक्षित स्मारक परिसरात सुरू असलेले अनाधिकृत बांधकामाची समक्ष पाहणी करून संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकच्या सहाय्यक संचालकांना देताच, अखेर सहा मुद्द्यांवर सहाय्यक संचालक आरती आळे यांनी उपोषणकर्त्यांच्या मुद्द्यांसंदर्भात सकारात्मक विवेचन करून लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. आणि तीन दिवशीय उपोषण मागे घेतले.
दरम्यान नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे यांनी सहा ऑक्टोबर रोजी लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिर संरक्षित स्मारक परिसरात अनाधिकृत बांधकामाची पाहणी करून संबंधित ग्रामपंचायत प्रशासन, ठेकेदार इत्यादींवर कायदेशीर कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन आरती आळे यांनी उपोषणकर्त्यांना दिल्याचे उपोषण करते किरण कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उपोषणकर्त्यांच्या भावना लक्षात घेत श्रीगोंद्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी आपल्या कर्तव्य भावनेतून वादी व प्रतिवादींच्या वेळोवेळी संपर्कात राहून त्यांनी मौलिक सहकार्य केले. त्याबरोबर गटविकास अधिकारी राणीताई फराटे यांनी देखील ग्रामपंचायत बाबत उपोषणकर्त्यांच्या तक्रारींची वेळोवेळी योग्य ती लेखी आश्वासन देत दखल घेतली व ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी समन्वय साधून उपोषणकर्त्यांच्या मागण्या संदर्भात कारवाई करण्याची दक्षता घेतली. व दोन दिवसात ग्रामविकास अधिकारी यांना समर्पक असा अहवाल दोन दिवसात देण्याचे आदेश दिले. याबाबत याप्रस्नी दिरंगाई अथवा विलंब होणार नाही याबाबत गांभीर्यपूर्वक नोंद घेतली. त्याबद्दल गटविकास अधिकारी श्रीमती राणीताई फराटे यांचे देखील उपोषणकर्ते किरण कुरुमकर व निलेश कुरुमकर यांनी आभार मानले.
दरम्यान पुरातत्त्व विभागाचा मुद्दा क्रमांक एक नुसार लिंपणगाव येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर या राज्य संरक्षित स्मारक परिसरात सुरू असलेले बांधकाम हे लिंपणगाव ग्रामपंचायतद्वारे "क" वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन विकास अंतर्गत होत आहे. सदर मंदिर राज्य सुरक्षित असल्यामुळे मंदिर परिसरात कुठलेही विकास कामे करायचे असल्यास त्यासाठी या कार्यालयाची तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक आहे. असा ठपका ठेवत त्याबाबत लिंपणगाव ग्रामपंचायतला प्रत्यक्षात तसे पत्रात कळवून काम थांबविणे बाबत सूचना देण्यात आले होत्या. या लेखी आश्वासनामध्ये नाशिकच्या सहाय्यक संचालक आरती काळे यांनी पुढे म्हटले आहे की, एक शासकीय यंत्रणा म्हणून या कार्यालयाने ग्रामपंचायतला सूचना दिले असतानाही त्यांनी त्याचे पालन केल्याचे दिसत नाही. असा आक्षेप नोंदवत. लिंपणगाव ग्रामपंचायत ही शासन यंत्रणेचाच एक भाग असल्याकारणाने या कार्यालयास या संदर्भात कोणतीही कारवाई करता येणार नाही. मात्र या कार्याद्वारे लिंपणगाव ग्रामपंचायत सदर मंदिर परिसरात या कार्यालयाच्या परवानगीशिवाय सुरू असलेले बांधकाम थांबविण्याबाबत संदर्भ पत्र क्रमांक तीन द्वारे सूचना देण्यात आली होती. असे नाशिकच्या सहाय्यक संचालकांनी उपोषणकर्त्यांना पाठवलेल्या लेखी आश्वासनात म्हटले आहे. या उपोषणकर्त्यांना उपोषण स्थळी जवळपास 100 ग्रामस्थांनी पाठिंबा व्यक्त केला होता.प्रामुख्याने बी आर एस एस चे घनश्याम शेलार, टिळक भोस, दीपक पाटील भोसले, ज्येष्ठ पत्रकार अनिल ढवाळ आदींनीही या कामी उपोषण स्थळी भेटून मदत केल्याचे उपोषण करते निलेश कुरुमकर व किरण कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
आता सहा ऑक्टोबर रोजी नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक हे लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात येऊन वादग्रस्त बांधकामाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्या पुढील कारवाई संदर्भात कोणते पाऊल उचलतात याकडे आता उपोषण करते व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी