महाराष्ट्र राज्यातील शिक्षण आरक्षण समस्या निवारणबाबत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन प्रा. रामदास झोळ सर यांची समस्या सोडवण्याची मागणी

By : Polticalface Team ,30-09-2023

महाराष्ट्र राज्यातील शिक्षण आरक्षण समस्या निवारणबाबत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन प्रा. रामदास झोळ सर यांची समस्या सोडवण्याची मागणी करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 महाराष्ट्र राज्यातील शिक्षण व आरक्षणाचे समस्या निवडण्यासाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी लक्ष देऊन समस्या सोडवण्याची मागणी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी 29 सप्टेंबर रोजी त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.त्यांच्यासमवेत शिवनगर विद्या प्रसारक मंडळ मालेगाव चे सचिव माननीय प्रमोद शिंदे सर यावेळी उपस्थित होते. शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीत सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये मागील काळात म्हणजेच लाॅकडाऊन मधील म्हणजेच 2020- 21 मध्ये आदरणीय शरद पवारसाहेब यांनी शिक्षण मंत्री उदय सामंत यांची बैठक लावून इतर राज्याप्रमाणे अभियांत्रिकी व औषध निर्माण अभ्यासाची प्रवेश पात्रता करण्याबाबत संबंधितांना सांगून बदल करण्यात आला .त्याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना झाला, परंतु प्रवेशाबाबतीत इतर विषयावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये इयत्ता बारावी नंतरच्या सर्व खाजगी विद्यापीठे व इतर महाविद्यालयाची प्रवेशाची अंतिम तारीख एकच करणे. सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया एकसारखी करणे. प्रवेश परीक्षा ची संख्या कमी करणे, समुपदेशन फेरी पुन्हा सुरू करणे इत्यादी बाबत चर्चा करून समस्या सोडवण्याची मागणी केली. याबरोबरच शिष्यवृत्ती मध्येही महाराष्ट्र राज्यांमध्ये सामाजिक आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक शुल्का मध्ये सवलत दिली जाते. सदरचे शुल्क शासन संबंधित महाविद्यालयाला देत असते, परंतु मागील दहा-बारा वर्षांपासून सदरची शुल्क देण्यामध्ये शासनाची दिंरगाई होत असल्याने शैक्षणिक संस्थांना बँकांची देणे, सरकारचे कर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार ,लाईट ,पाणी, इंटरनेट व इतर मेंटेनेसची बिले वेळेस देण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग, बहुजन समाज कल्याण विभाग व इतर आणि विभागाचे राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्याची मागणी करण्यात आली. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व धनगर समाजातील विद्यार्थ्यांना असणारी स्वयंम व स्वधार योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील व्यावसायिक महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व धनगर समाजातील विद्यार्थ्यांना स्वयंम व स्वधार योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे . तसेच महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत महाराष्ट्र व केंद्र सरकार यांना वारंवार मागणी केलेली आहे .परंतु सदरचे आरक्षण न मिळाल्याने समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणून सध्या आरक्षण मिळेपर्यंत इतर समाज बांधवांप्रमाणे आरक्षणाशिवाय, मराठा समाजाला देता येऊ शकणाऱ्या शैक्षणिक व इतर सवलती बाबत विविध मुद्द्याद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे ,शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर, प्राध्यापक रामदास झोळ,माननीय मंगेश चिवटे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांच्या समवेत सह्याद्री अतिथी गृहावरती पूर्ण परवानगीने मीटिंग लावून मागणी करण्यात आली होती. याबाबतची माहिती देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मीटिंगमध्ये देण्यात आली. त्याचबरोबर इतर समाज बांधवाप्रमाणे आरक्षणाशिवाय मराठा समाजातील युवकांना देता येऊ शकणारे शैक्षणिक व इतर सवलती बाबत चर्चा करण्यात आली. सदर मागण्या पूर्ण करण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांनी लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात, याबाबतची चर्चा करून याबाबत मागणीचे निवेदन प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी दिले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.