शासकीय नोकरभरती ला मराठा क्रांती मोर्चा चा विरोध, नितिन खटके पुणे विभागीय कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड

By : Polticalface Team ,30-09-2023

शासकीय नोकरभरती ला मराठा क्रांती मोर्चा चा विरोध, 
नितिन खटके पुणे विभागीय कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 शासकीय नोकर भरतीला मराठा क्रांती मोर्चाचा कडवा विरोध असल्याची माहिती पुणे विभागीय संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष नितीन खटके यांनी बोलताना माहिती दिली.
याबाबत अधिक माहिती देताना खटके पुढे म्हणाले की मराठा समाज ओबीसी प्रवर्गातुन कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षण मागत असुन मनोज जरांगे पाटिल यांच्या उपोषण आंदोलन मुळे मराठा पुन्हा एकदा पेटुन उठला आहे ! जरांगे यांनी उपोषण सोडावे यासाठी एक महिना ची मुदत घेऊन सरकार आरक्षण बाबत संवेदनशील आहे असं वाटतं असतानाच मराठा समाजाला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्याचे सरकार चे कारनामे काही थांबलेले नाहीत असे ते म्हणाले
सगळेच जाणतो की सध्या मनोज जरांगे यांचे ओबीसी प्रवर्गातुन कायदेशीर आणि घटनात्मक मराठा आरक्षण या मागणीबाबत महिनाभरात सरकार कडुन काय तो सकारात्मक निर्णय लागेल अशी आशा आहे !
पण याचवेळी दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने ६०,००० शासकीय पदासाठी नोकरभरती काढली आहे ! आपण सगळेच जाणतो की खुल्या वर्गातील जास्त मेरीट मुळे शासकीय नोकरीत मराठा टक्केवारी कमी होत चालली आहे आणि शासकीय नोकरीत मराठा नगण्य होत चालला आहे ! एकीकडे जरांगे यांना उपोषण आंदोलन पासुन परावृत्त करायचे, वेळ मारुन न्यायची आणि दुसरीकडे शासकीय नोकरभरती करून मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसायचा असा विचित्र प्रकार सरकार करत आहे असे नितीन खटके बोलताना म्हणाले
समजा सुदैवाने एक महिना नंतर समाजाच्या दबावामुळे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जर सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले तरी ही नोकरभरती त्या आधीच संपलेली असणार ! या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन " शासनाने किमान एक महिना ही शासकीय नोकरभरती थांबवावी" अशी मागणी सकल मराठा समाजामार्फत आम्ही करत आहोत, सरकारने या मागणीची गंभीर दखल घ्यावी अन्यथा मराठा समाज नोकरभरती होऊ देणार नाही आणि होणा-या परिणामांची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल. असे शेवटी खटके म्हणाले

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष