लिंपणगाव येथील वृद्ध महिलेवर पिसाळलेल्या कोल्ह्याचा हल्ला महिला गंभीर जखमी

By : Polticalface Team ,30-09-2023

लिंपणगाव येथील वृद्ध महिलेवर पिसाळलेल्या कोल्ह्याचा हल्ला महिला गंभीर जखमी लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील वडार वस्ती येथे पिसळलेल्या अवस्थेत कोल्ह्याने वृद्ध महिलेवर अचानक हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अचानक पिसाळलेल्या कोल्हा वडार वस्तीमध्ये सैरावैरा पळत असताना अचानक एका वडार वस्तीतील गल्लीत गेला. तिथे त्या कोल्ह्याने गोठ्यातील एका गाईला चावा घेऊन गंभीर जखमी केले. तेथेच लघुशंकेसाठी आलेली वृद्ध महिला मुक्ताबाई लक्ष्मण लष्करे वय 70 वर्ष या वृद्ध महिलेला देखील या कोल्ह्याने हाताला व पायाला गंभीर चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे आता एकीकडे बिबट्यांचा या परिसरात बेवारस धुमाकूळ होत असतानाच कोल्ह्याची संख्या देखील अधिक दिसून येत आहे. वनविभागाने लिंपणगाव सह मुंडेकरवाडी, शेंडेवाडी, अजनुज, गणेशा इत्यादी गावांमध्ये बिबट्यांची देखील मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामध्ये आता पिसाळलेल्या अवस्थेत कोल्ह्याने मात्र लिंपणगावच्या वडार वस्तीत मोठा धुमाकूळ दहशत वाढवल्याने वनविभागा पुढे मोठे आता आवाहन उभे राहिले आहे. दरम्यान जखमी अवस्थेतील वृद्ध महिलेला गावातील तरुणांनी काष्टी येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता महिलेची प्रकृती सुधारत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान कोल्ह्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेली वृद्ध महिला ही निराधार असून, गरीब कुटुंबातील मोलमजुरी करणारी या महिलेला वनविभागाने शासन नियमानुसार आर्थिक मदत द्यावी. महिलेवर कोल्ह्याने हल्ला करताना सर्व अंगाला चावा घेतल्याने रक्तस्राव अधिक झाल्याचे तरुणांनी सांगितले. सर्पमित्र कमलेश गुंजाळ यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले. हल्ला प्रसंगी महिलेचे पुतणे बाबू लष्करे यांनी अत्यंत प्रसंगावधान राखून कोल्ह्याला महिलेपासून दूर केले. अन्यथा वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता. अशी स्थिती या हल्ला प्रसंगी दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनास्थळी काही तासांमध्ये वन रक्षक डफडे यांनी तात्काळ धाव घेतली व सदर बेवारस कोल्ह्याला ताब्यात घेऊन श्रीगोंदा येथील वनविभागाच्या कार्यालयामध्ये कोल्ह्याची विल्हेवाट लावण्याचे वनरक्षक दफडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.