इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर हे एक महान प्रेषित होते त्यांची शिकवण आजच्या प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आत्मसात करावी: माजी आमदार नारायण आबा पाटील
By : Polticalface Team ,02-10-2023
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर हे एक महान प्रेषित होते आजच्या प्रत्येक मुस्लिम बांधवांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आत्मसात करणे गरजेचे आहे इस्लाम धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मुस्लिम बांधवांसाठी आजचा दिवस पवित्र असा महत्त्वाचा आहे हजरत मोहम्मद पैगंबर जयंती म्हणजेच भाईचारा इन्सानियत या विचारांची पाळेमुळे घट्ट करणारा सण असून मुस्लिम बांधव व सर्वांनाच या दिवसाबद्दल आदर आहे असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले
.
जेऊर ता करमाळा येथे हजरत मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जेऊर येथील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या प्रमाणात मिरवणूक अर्थात जुलूस काढण्यात आला याची सुरुवात इंदिरानगर येथील मशिदीपासून करून प्रमुख बाजारपेठ येथून मार्गस्थ होऊन शेवटी आलीफ मशिद येथे सांगता करण्यात आला यामध्ये विशेष करून काबा शरीफ ची प्रतिकृती तयार करून याची मिरवणूक काढण्यात आली हे या जयंतीचे विशेष आकर्षण ठरले माजी आमदार नारायण पाटील यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सभापती अतुल पाटील, सरपंच भारत साळवे, माजी सरपंच भास्कर कांडेकर, राजूशेठ गादीया, उपसरपंच धनंजय शिरसकर, उपसरपंच अंगद गोडसे, सदस्य नागेश झांजूर्णे, संदीप कोठारी, शांताराम सुतार, बापू घाडगे, योगेश करणवर, संतोष वाघमोडे, राजू लोंढे, राजू जगताप, हनुमंत विटकर, परमेश्वर पाटील, नवीन दोशी, संपत राठोड, भारत महाविद्यालय प्राचार्य अनंत शिंगाडे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जुनराव सरक, आनंद मोरे, सुयोग दोशी यश विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध संघटना संबधित मान्यवर उपस्थित होते. यानंतर प्रसार माध्यामाशी बोलताना माजी आमदार नारायण पाटील यांनी आपण मुस्लिम बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सतत प्रयत्न केले असून भविष्यातही या समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तर सन 2014 ते 2019 या दरम्यान आवाटी येथील हजरत वली चांद पाशा उर्फ वलिबाबा दर्गाह शरीफ या दर्गाहासाठी तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देऊन दोन कोटी रुपये विकास निधी मिळवून देण्यात माजी आमदार नारायण पाटील यांनी पुढाकर घेतला.
मुस्लिम व सर्वच धर्मातील लोक या पवित्र स्थानी येतात त्यामुळे या ठिकाणी चांगल्या मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे काम माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. करमाळा, आवाटी, कंदर, रोपळे उमरड तसेच केम येथील मुस्लिम समाजाने आयोजित सर्व कार्यक्रमांना माजी आमदार पाटील हे वेळ काढून उपस्थित राहत असून सामाजिक सलोखा जपण्याचे काम करत असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.
एकंदर पाहता हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या
जेऊर येथील हजरत मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरा करण्यासाठी जेऊर येथील समस्त मुस्लिम बांधवांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल पोलीस प्रशासनाचा देखील सत्कार करण्यात आला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.