करमाळा तालुक्यात पुनर्वसन कामासाठी 3 कोटी 22 लाख रुपयाचा निधी मंजूर: माजी आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

By : Polticalface Team ,02-10-2023

करमाळा तालुक्यात पुनर्वसन कामासाठी 3 कोटी 22 लाख रुपयाचा निधी मंजूर: माजी आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती करमाळा प्रतिनिधी अलीमशेख मोबाईल 98 50 68 63 60 करमाळा तालुक्यात पुनर्वसन कामासाठी 3 कोटी 22 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचं माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिक विस्ताराने माहिती देताना पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील 30 गावांनी उजनी धरणाच्या निर्मितीसाठी त्याग केला असल्याने या गावांचे पुनर्वसन 18 मूलभूत नागरी सुविधा देऊन केले गेले नाही. यामुळे आपण सतत या प्रश्नावर लक्ष केंद्रीत केले व 21 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली व सन 2014 पासून सतत पाठपुरावा केला. यातील बहुतांश कामांसाठी निधी मंजूर झाला व कामे सुध्दा सुरू झाली आहेत. आता यातील 3 कोटी 22 लाख 3 हजार 649 रुपये आणखी मंजूर झाले आहेत. या कामांना (शासन निर्णय आदेश - अर्थ स 23/प्र क्र 70/र 8 व अर्थ स 23/ प्र क्र 71/र 8 ) नुसार मंजुरीचे अंतरिम आदेश देण्यात आलेले आहेत. या निधीतून रिटेवाडी येथील शाळा संरक्षण भिंत (प्र मा. रक्कम 13 लक्ष 25 हजार 115 रू मधील पूर्ण रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. गाव पोहच रस्ता डांबरीकरण (सा. क्र 0/७० ते 1/००) प्र मा रक्कम 1,63,10,100 रू पैकी 21 लाख 5 हजार रु वितरीत करण्यात येणार आहेत. तसेच पोहच रस्ता डांबरीकरण (सा. क्र 1/00 ते 1/575) प्र मा रक्कम 6755100 रू पैकी 20 लाख 45 हजार रु वितरीत करण्यात येणार आहेत. तर भिवरवाडी येथील अंतर्गत खडीकरण रस्ते कामासाठी प्र मा 41,11,575 पैकी सर्व रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. ढोकरी येथील अंतर्गत खडीकरण रस्ते कामासाठी प्र म 37,01760 पैकी सर्व रक्कम वितरीत वितरीत करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 3 कोटी 22 लाख 3 हजार 649 रुपये मंजुर झाले आहेत. पुनर्वसन कामांना गती देऊन सर्वच मंजूर कामे तातडीने पूर्ण करावीत. आजही पुनर्वसित गावांना स्मशानभूमी, तिथं पर्यंतचा पोहोच रस्ता, गावातील शाळांसाठी वर्ग खोली, गाव अंतर्गत भक्कम रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा तसेच वीज व आरोग्य सुविधा पूर्ण प्रमाणात मिळालेल्या नाहीत. 2014 पासून सतत पाठपुरावा चालू ठेवल्याने अनेक दशके रखडलेला व दुर्लक्ष्य झालेला 30 गावास महत्वाचा वाटणारा प्रश्न सोडवण्यात आपणास यश आले. आगामी काळातही पुनर्वसित गावांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सतत प्रयत्न करीत राहणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी