लिंपणगावच्या बस स्थानकावरील कारखान्याकडे मार्गस्थ रस्ता बनला धोकादायक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालावे!
By : Polticalface Team ,02-10-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)- सहकार महर्षी नागवडे कारखान्याकडे मार्गस्थ होणारा लिंपणगाव बस स्थानकात नजीकचा रस्ता जागोजागी दबल्याने सदर रस्ता धोकेदायक बनला गेला आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अन्यथा गंभीर अपघाताला निमंत्रण मिळू शकते.
दरम्यान लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट हा रस्ता अनेक दिवसापासून खड्डेमय बनला गेला आहे. या रस्त्यातून पायी चालणे देखील मुश्किल बनले असून, या रस्त्याच्या मध्यभागी दोन ते अडीच फूट खोल खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. त्यामध्ये लिंपणगावच्या बस स्थानकावर नागवडे कारखान्याकडे मार्गस्थ होताना पुलावरील रस्ता दबला गेला असून, कारचालकांना मात्र जीव मोठीच धरूनच या रस्त्यातून वाहन चालवावे लागते. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे अनेक वर्षापासून समाविष्ट करण्यात आलेला आहे. परंतु या रस्त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्णतः पाठ फिरवल्याने प्रवास करताना अनेकांचा जीव मात्र आता टांगणीला आला आहे. तर याच रस्ता मार्गावर चार किलोमीटर अंतरावर नागवडे कारखाना असून या रस्त्यातून नेहमीच सभासद कामगार व प्रवाशांची वर्दळ असते. परंतु हा रस्ता अत्यंत धोकादायक बनल्याने गंभीर अपघाताला निमंत्रण मिळू शकते.
लिंपणगावच्या ग्रामस्थांनी अनेक वेळा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्रीगोंदा कार्यालयाशी संपर्क साधून या रस्त्याची दुरुस्तीची मागणी अनेक वर्षापासून असतानाही अधिकाऱ्यांनी मात्र या रस्त्याच्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. किती? बळी गेल्यानंतर हा रस्ता आपण दुरुस्त करणार असाच सवाल मेजर खाशेराव पवार यांनी उपस्थित केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र डोळे झाक करताना दिसत आहे. त्यामध्ये आता लवकरच कारखान्याचे गाळप हंगाम सुरू होत आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने या रस्त्यातून मार्गस्थ होणार आहेत. तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिंपणगावच्या बस स्थानकापासून रेल्वे गेट पर्यंत किमान खड्ड्यांची तरी दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वाहनचालक कामगार इत्यादींनी केली आहे.
वाचक क्रमांक :