बहुजन समाजासाठी कर्मवीरांनी वस्तीगृहाची निर्मिती केली -प्रा.डॉ.सुधाकर शेलार
By : Polticalface Team ,03-10-2023
श्रीगोंदा : बहुजन समाजासाठी कर्मवीरांनी वस्तीगृहाची निर्मिती केली असे प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ.सुधाकर शेलार यांनी केली .ते श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेलवंडी बु. येथे डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ वा जयंती सोहळा समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले बहुजनांसाठी सदैव झटणारे, शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजापर्यंतपोहोचविणारे शाहू,फुले,यांचा आदर्श घेऊन,शैक्षणिक कार्याचा वारसा जपणारे,बहुजन समाजासाठी वस्तीग्रहाचे निर्मिती करणारे थोर शिक्षणमहर्षी म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होतें. आज संस्थेतील असंख्य विद्यार्थी उच्चपद भूषवित आहेत. समाजाने कर्मवीर अण्णांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा वारसा कायम पुढे चालविला पाहिजे. संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी वेळोवेळी सहकार्य करून प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरीक्षण करा असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
याप्रसंगी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विलासराव भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर यांनी स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचे अभिनंदन केले.
आमदार बबनरावजी पाचपुते यांनी जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य,आण्णासाहेब शेलार हे होते. ते म्हणाले कर्मवीर अण्णांच्या कार्य आणि विचार यांच्या प्रेरणेने आमचे आजोबा कै.गंगाराम (आबा )शेलार यांनी विद्यालयास एक हेक्टर एक आर जमीन दिली.दिवसेंदिवस विद्यालयाची भौतिक,गुणात्मक,आणि संख्यात्मक प्रगती होत आहे. आज बहुसंख्य विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्य करत आहेत.विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ सदैव तत्पर आहोत.या गावाने शैक्षणिक कार्यासाठी दानशूरतेचा वारसा जपून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.असे मत त्यांनी व्यक्त केले.याप्रसंगी सिद्धी अरुण पानसरे या विद्यार्थिनींनी कर्मवीरांविषयी मनोगत व्यक्त केले.वाढदिवसानिमित्त ओम राजू कड याने विद्यालयास ११०० रुपयांची देणगी दिली आणि अथर्व शिवाजी इथापे याने एक झाड विद्यालयास भेट दिले.सन २०२१-२२ मधील इ.८वी मधील एन.एम.एम.एस.व सारथी शिष्यवृत्तीधारक २८ विद्यार्थ्यांनी २८ हजार रुपयांची देणगी विद्यालयास दिली.
या कार्यक्रमासाठी ज्ञानदेवराव हिरवे, तात्यासाहेब हिरवे, गोपीचंद इथापे, सुभाषराव काळाणे, सुखदेव लाढाणे, गंगाराम हिरवे, बाळासाहेब ढवळे, सोपानराव हिरवे, युवराज पवार, एकनाथ पवार, एकनाथ बोरुडे, सदाशिव भोसले,भगवान वैद्य, मधुकर शेलार,जयसिंग लबडे, नामदेव साळवे,आनंदा माने,अशोक शेलार, मुरलीधर ढवळे, आश्रू डाके, संजय डाके, अरुण डाके, शरद इथापे, ज्ञानदेव शेलार, साहेबराव शेलार,विजय काळाने,अशोक शिंदे,सुनील ढवळे, संतोष काळाने,संतोष शेलार,संभाजी काळाने,मधुकर पवार, बाळासाहेब जाधव,बाळासाहेब डाके,शांताराम शेलार,शांताराम खेडकर,संदीप बेल्हेकर,दिपक धनवडे, बाजीराव काळाने, वाळके मेजर,भाऊमामा हिरवे, निवृत्ती शेलार, सुनीता दरवडे, दिपचंद वायदंडे, बापू लाटे, संदीप तरटे, स्वप्नील घोडेकर,नामदेव खेडकर,नारायण चोभे,खेडकर सर, छबु खेडकर, अरुण साळवे,खंडू नगरे,अश्रूद्दीन हवालदार,पत्रकार योगेश चंदन, सर्जेराव साळवे,संस्थेचे अभियंते नलगे साहेब आणि साळुंखे साहेब,भीमराव पवार, हौसराव दातीर, विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,शालेय विविध समित्यांचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य उत्तम बुधवंत यांनी केले. सूत्रसंचालन सुजाता डाके,मनिषा व्यवहारे,विजया शेलार यांनी केले.उपस्थितांचे आभार विजय चव्हाण यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.