अखेर लेखी आश्वासनानंतर युवकांचे स्मशानभूमीतील आमरण उपोषण मागे
By : Polticalface Team ,06-10-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव अंतर्गत असणारी मुंढेकरवाडी येथील युवकांनी समस्यानभूमी मधील विविध कामांंबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभेमध्ये विकास कामास संदर्भात ठराव होऊन देखील सामाजिक कामाची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली नसल्याकारणाने मुंढेकर वाडीचे युवक कार्यकर्ते योगेश चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते किरण कुरुमकर यांनी शुक्रवारी 6 ऑक्टोबर पासून मुंढेकर वाडीच्या समस्यानभूमीमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाचा पहिलाच दिवस असल्याने लिंपणगाव व मुंढेकरवाडी येथील अनेक युवकांनी व ग्रामस्थांनी या उपोषणाला प्रामुख्याने बी आर एस एस चे टिळक भोस, मेजर प्रकािश चव्हाण, निलेश कुरुमकर, माजी सरपंच अरविंद कुरुमकर, विजय कुरुमकर, कमलेश गुंजाळ, हनुमंत कुरुमकर, अजित चव्हाण, संतोष जाधव, तात्या कणसे, आबा लोखंडे, बबन कुरुमकर, सतीश भगत आदींनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला आहे.
दरम्यान उपोषण करते योगेश चव्हाण व किरण कुरुमकर यांनी गटविकास अधिकारी व संबंधितांना पाठवलेल्या निवेदनात जवळपास आठ प्रमुख विकास कामांच्या मागण्यांची ग्रामपंचायत प्रशासनाने विना विलंब कार्यवाही करावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उपोषण दरम्यान पंचायत समितीचे कक्षा अधिकारी डीडी समुद्र ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी श्री धायगुडे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या पंधरा दिवसात मार्गी लावण्यात येईल. असे आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
या लेखी आश्वासनामध्ये मुंढेकरवाडी येथील स्मशानभूमी येथे पंधरावा वित्त आयोग सन 2022- 23मुंढेकरवाडी, खोडवेवस्ती, कासारपत्रावस्ती, जाधव वस्ती, समशानभूमी हातपंप घेणे, या कामासाठी दोन लाख 40 हजार तरतूद करण्यात आलेली आहे. 2023 24 मध्ये वार्ड क्रमांक सहा मध्ये गटार लाईन करणे, हे काम प्रास्तावित आहे. त्यासाठी चार लाख रुपये इतकी तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे उपोषणकर्त्यांनी सुचविलेनुसार जन सुविधा योजनेअंतर्गत नवीन आरसीसी स्मशानभूमी विकसित करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे देण्यात येईल. तसेच समशानभूमीमध्ये लाईट बल्बची सुविधा करण्यात येईल. पंचक्रोशीमध्ये सर्व ठिकाणी विविध योजना अंतर्गत झालेल्या विकास कामांचा बोर्ड लावण्याचे सुचविले होते, त्याची चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल. स्ट्रीट लाईट बसविणे वार्ड क्रमांक सहा सात वार्ड नंबर सहा मधील बंद बल्ब नवीन बसविण्यात येतील. यादी लेखी स्वरुपात ग्रामविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना कळविले असल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले असल्याचे उपोषण करते योगेश चव्हाण व किरण कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी