ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यात पाटील गट बाजी मारणार, सोळा पैकी दहा ग्रामपंचायतीवर पाटील गटाचा दावा
By : Polticalface Team ,06-10-2023
करमाळा प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यात माजी आमदार नारायण पाटील गट आघाडीवर असणार, दहा ग्रामपंचायतीवर विजय मिळवू असा दावा माजी आमदार नारायण पाटील गटाकडून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.
करमाळा तालुक्यातील जेऊर, चिखलठाण, कंदर, केम, निंभोरे,
घोटी, गौंडरे, रावगाव, विट, कोर्टी, उंदरगाव, राजुरी, केतुर, कावळवाडी, भगतवाडी व रामवाडी या सोळा ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आचार संहिता लागू झाली आहे. माजी आमदार नारायण पाटील गटाने सर्वात प्रथम ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आपला अंदाज व्यक्त केला. यावेळी अधिक बोलताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या नेतृत्वावर करमाळा तालुक्यातील जनतेचा विश्वास टिकून आहे. मागील तीन टप्प्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकात पाटील गटाने बाजी मारून सर्वाधिक ग्रामपंचायतीवर आपली सत्ता प्रस्थपित केली होती तसेच पाटील गटाचे सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते.तर जनतेतून सरपंच पदावरही पाटील गटाचे कार्यकर्ते आणि खास करून मोठ्या संख्येने महिला रणरागिणी विजयी झाल्या. या सोळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुध्दा पाटील गटाचा झेंडा सर्वाधिक ग्रामपंचायतीवर फडकेल. माजी आमदार नारायण पाटील हे 24 तास जनतेच्या सेवेसाठी वेळ देणारे नेते असून सत्ता असो वा नसो जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ते क्रियाशील असल्याने याचा फायदा निवडणुकीत निश्चितच होणार आहे. करमाळा तालुक्यातील सन 2014 ते 2019 मधील विकास कामे लोकांना ठळक दिसून येतात तर याउलट 2019 नंतर ठप्प असलेली विकासकामे मतदारांना अडचणी निर्माण करत आहेत.याचे पडसाद अगदी ग्रामपंचायत निवडणुकीत सुध्दा उमटल्याशिवाय राहणार नाहीत. माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटील गटातील सर्व पदाधिकारी व गावोगावचे कार्यकर्ते या निवडणुकीच्या तयारीला लागले असून याचा एकत्रीत चांगला परिणाम निवडणूक निकालात दिसून येईल असा आत्मिश्वास प्रवक्ते सुनील तळेकर यांनी बोलून दाखवला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी