बारामती नगर परिषदेच्या मालकीच्या बंद अवस्थेतील गाळ्यांची डागडुजी, करून त्या गाळ्यांचे फेरलीलाव कारण्यात यावे
By : Polticalface Team ,10-10-2023
बारामती (प्रतिनिधी
जनआधार न्युज बारामती
भिमसेन जाधव
मो 9112131616): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम फेज चार मधील बारामती नगर परिषदेच्या मालकीचे बंद अवस्थेतील गाळ्यांची डागडुजी, रंगरंगोटी विद्युतव्यवस्था आदी करून सदरील गाळ्यांचे फेरलीलाव करण्यात यावेत तसेच फेरलिलाव पद्धतीमध्ये गाळ्यांची अनामत रक्कम आणि भाडे मागील लिलावाच्या तुलनेने कमी करण्यात यावे.फेरलीलाव प्रक्रियेमध्ये शहरातील अनुसूचित जाती जमाती मधील नागरिकांना विशेष प्राधान्य देण्यात यावे अशा स्वरूपाचे लेखी निवेदन मा.रविंद्र (पप्पू)सोनवणे -युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI(आठवले)यांच्या माध्यमातून बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा.महेशजी रोकडे साहेब तसेच मा.उपविभागीय अधिकारीसाहेब बारामती यांना देण्यात आले.यावेळी मा.सुनीलजी शिंदे (उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र RPI) मा.संजयजी वाघमारे (बारामती तालुकाध्यक्ष RPI) मा.अभिजीत कांबळे (बारामती शहराध्यक्ष RPI) मा .सुरेश भोसले (तालुका उपाध्यक्ष RPI) उपस्थित होते.
वाचक क्रमांक :