यश प्राप्तीसाठी परिस्थिती अडसर नसते- संदीप मोटे

By : Polticalface Team ,10-10-2023

यश प्राप्तीसाठी परिस्थिती अडसर नसते- संदीप मोटे "श्रीगोंदा : "यश प्राप्तीसाठी परिस्थिती अडसर नसते, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन श्री.संदीप मोटे पाटील यांनी केले. ते राहुल विद्यार्थी वस्तीगृह श्रीगोंदा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, "बहुजन चळवळीतल्या सर्व महापुरुषांनी अडचणीवर मात करीत शिक्षणाची चळवळ जिवंत ठेवली. त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे विशेष योगदान आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच कर्मवीर भाऊराव पाटील ,संत गाडगे महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिक्षण चळवळ गतिमान केली. वस्तीगृह चळवळ टिकवणे अत्यंत हलाखीचे आहे परंतु अशाही प्रसंगी आपण परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी तत्पर रहावे". वस्तीगृहासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मोटे यांनी दिले. याप्रसंगी शिकाई मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत विभागीय पातळीवर १७ वर्षे वयोगटात विशाल काळे व १९ वर्षे वयोगटात अनिकेत चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागर कराळे सर होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक राहुल विद्यार्थी वस्तीगृहाचे समन्वयक सतीश ओहोळ यांनी केले . तर आभार प्रशांत चव्हाण यांनी मांडले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी