छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा.
By : Polticalface Team ,11-10-2023
श्रीगोंदा :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय महाविद्यालय, श्रीगोंदा आयोजित जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. या जिल्ह्यातील दोनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन युवक नेते पृथ्वीराज बाबा नागवडे यांच्या हस्ते झाले व कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सतीशचंद्र सूर्यवंशी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. याप्रसंगी शिकई मार्शल आर्ट चे विभागीय प्रमुख चंद्रकांत राहींज व पारनेर तालुका क्रीडा अध्यक्ष बापूसाहेब होळकर,श्रीगोंदा तालुका क्रीडा अध्यक्ष बापूराव गायकवाड,शिक्षक सोसायटीचे चेअरमन दिलीपराव काटे यावेळी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशाल काळे, प्रसाद किनकर, अनिकेत चव्हाण, साक्षी गांजुरे, ढगे अनुराधा शबनम शेख सिद्धी वाळुंज यांचा समावेश आहे. वरील सर्व खेळाडूंना महाविद्यालयातील महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रा. सतीश चोरमले व क्रीडा शिक्षक प्रा.महेश गिरमकर यांचे मार्गदर्शन लाभले. पंच म्हणून योगेश वागस्कर वैशाली बांगर आणि शुभम राहींज यांनी काम पाहिले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शंकर गवते यांनी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी