सामाजिक कार्यकर्ते आमोद नलगे यांना सन 2023 चा माजी राष्ट्रपती डॉ. जाकिर हुसेन पुरस्कार जाहीर
By : Polticalface Team ,11-10-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) -श्रीगोंदा तालुक्यातील कोळगांव येथील सामाजिक कार्यकर्ते आमोद नलगे यांना जळगांव जिल्ह्यातील आदिलशहा फारूकी बहुउद्देशीय संस्थेमार्फत दिला जाणारा सन 2023चा राज्यस्तरीय माजी राष्ट्रापती डाॅ.जाकीर हुसैन समाज गौरव पुरस्कार जाहीर झाला असून तसे पत्र अध्यक्ष फारूख शहा नौमानी यांनी दिले आहे.येत्या 19 नोव्हेंबर रोजी हा सोहळा अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
आमोद नलगे हे बालपणा पासूनच समाजप्रिय आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक सामाजिक,शैक्षणिक ,धार्मिक उपक्रम राबवले आहेत.शिक्षक आणि शिक्षक शिक्षकेत्तर बांधवांचे अनेक आंदोलन छेडून त्यात सहभाग घेऊन ते अग्रभागी राहीले आहेत. सध्या ते शिक्षकेत्तर संघटना अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, ईब्टा संघटना जिल्हा सचिव, अहमदनगर जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे सदस्य अशा अनेक पदांवर काम करतात.
सामाजिक कार्यात त्यांनी वृक्षारोपण व जतन, धार्मिक ठिकाणी लाईट सुविधा, शालेय वस्तू वाटप, अशी अनेक समाजोपयोगी कार्य केली आहेत.
राजकीय प्रवासातही त्यांनी गावपातळी पासून ते जिल्हा पातळीपर्यंत विविध पदे भूषवली असून राजकारणातून त्यांनी समाजकारणच केले आहे.
धार्मिक कार्यातही ते अग्रेसर असतात आद्य स्वामी शिवानंद दादाजी परीवाराचे ते साधक आहेत. आपल्या सत्य व समाजप्रिय स्वभावामुळे ते अल्पावधीतच समाजात व शिक्षण क्षेत्रात लोकप्रिय झाले आहेत.
या त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे या पूर्वीही त्यांना लोकसत्ता संघर्षचा समाज भुषण, डोंगरे प्रतिष्ठानचा समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.ते न्यू इंग्लिश स्कूल पागोरी पिंपळगाव या शाळेत कार्यरत आहेत.या पुरस्कारा बद्दल सर्व क्षेत्रातून नलगे यांच अभिनंदन होत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी