नागवडे इंग्लिश मीडियमच्या शर्वरी गोलांडेला खेलो इंडियामध्ये कांस्यपदक
By : Polticalface Team ,12-10-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या खेलो इंडिया मोहिमे अंतर्गत ७ ऑक्टोबर रोजी खराडी, पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय खेलो इंडिया वुमन्स किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये शिवाजीराव नागवडे इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी शर्वरी गोलांडे हिने कांस्यपदक पटकावले. गायत्री भुजबळ आणि राजनंदिनी वाघिरे यांनी स्पर्धेत सहभाग घेत ९ वे स्थान पटकावले.
शालेय पावसाळी तालुकास्तरीय व्हालीबॉल स्पर्धेमध्ये नागवडे इंग्लिश मीडियम च्या संघांनी निर्विवाद वर्चस्व गाजविले . शिवाजीराव नागवडे डेफोडिल्स स्कूलच्या 14 व 17 वर्षे हॉलीबॉल मुला व मुलींच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला तर 17 वर्षे वयोगटांमध्ये कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम च्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
तसेच सार्थक पवार, सर्वज्ञा भोर यांनी तालुकास्तरीय उंच उडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तर 400 मीटर रनिंग रेसमध्ये समीक्षा गायकवाड हीने द्वितीय क्रमांक पटकावला.जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये शौर्य भुजबळ याने रौप्य तर स्वयम कदम याने कांस्यपदक पटकावले.
श्रावणी कोकरे आणि अतिथी पटेल या खेळाडूंना जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.
या सर्व खेळाडूंना विविध स्पर्धांतील विशेष कामगिरीबद्दल तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान चे निरीक्षक एस.पी. गोलांडे सर, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे सर्व यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक कैलास ढवळे, अक्षयकुमार शिंदे, राजश्री नागवडे, कराटे प्रशिक्षक जयेश आनंदकर यांचा देखील विद्यालयाचे वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना संस्थेचे निरीक्षक एस पी गोलांडे यांनी यशस्वी खेळाडू आणि क्रीडाशिक्षक यांनी विद्यालयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजविल्याबद्दल कौतुक केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे यांनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :