इंदिरा गांधी विद्यानिकेतन खो-खो स्पर्धेत तालुक्यात अव्वलस्थानी
By : Polticalface Team ,13-10-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बेलवंडी या ठिकाणी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय पावसाळी खो-खो क्रीडा स्पर्धेत वयवर्षे १४ व १७ वर्षीय मुलींच्या संघात इंदिरा गांधी विद्या निकेतन, श्रीगोंदा फॅक्टरी या विद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावत प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम राखून विद्यालयाची मान उंचावली आहे.
सर्व खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांचे श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्रदादा नागवडे, अहमदननगर जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई राजेंद्रदादा नागवडे तसेच विश्वस्त श्री विठ्ठलबापू जंगले, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदेसाहेब, निरीक्षक श्री सचिनराव लगड, मुख्याध्यापक श्री शिवाजीराव गवळी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :