करमाळा येथील प्रसिद्ध कमला भवानी मंदिरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू!! मंदिर जिर्णोध्दाराचे काम प्रगतीपथावर!!

By : Polticalface Team ,14-10-2023

करमाळा येथील प्रसिद्ध कमला भवानी मंदिरात  नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू!! मंदिर जिर्णोध्दाराचे काम प्रगतीपथावर!!  करमाळा अलीम शेख करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध अशा श्रीदेवीचामाळ येथील श्री कमला भवानी मंदिरात नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी चालू असून दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता घटस्थापना होवून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे या नऊ दिवस चालणा-या नवरात्र उत्सवात रोज सकाळी ९ वाजता व रात्री ९ वाजता महाआरती सोहळा संपन्न होणार आहे. हा आरती सोहळा पहाण्यासाठी हजारो भाविक रोज हजेरी लावतात.
मानवी जीवनात शक्तीच्या उपासनेला अगदी प्राचीन काळापासून विशेष महत्त्व आहे निसर्गातील अदृश्य शक्तीभोवती देवत्वाची वलय गुंफून दैवी स्वरूपात तिची उपासना मानव पुर्वीपासून करू लागला. दुःखीतांचे दुःख दूर करणारी आणि दुर्जनांचा संहार करणारी रणचंदडीका ही अनेक रूपातून प्रगटते,म्हणूनच आजच्या काळातही शक्तीची उपासना प्रेरणादायी ठरते या उपासनेला वेदपूर्व काळापासून प्रारंभ झाल्याचे आढळून येते त्यानंतरच्या कालखंडात पुराण वाङ्मयात देवीच्या अनेक अवतार कथा निर्माण झाल्या प्रामुख्याने स्कंद पुराण मार्कंडेय पुराण व देवी भागवत या ग्रंथात देवी भवानीच्या अनेक अवतार कथांचा निर्देश आढळून येतो सज्जनाचे रक्षण व दुर्जनाचा नाश हा उद्देश कथांमधून दिसून येतो तसेच देवीचे महात्म्य वर्णन व उपासने बाबत सप्तशतीत उल्लेख आढळतो. नवरात्रीचे नऊ दिवसात भवानी मातेची नऊ रूपात पूजा मांडली जाते पहिल्या दिवशी शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या दुर्गाईची, दुसऱ्या दिवशी शक्तीचे प्रतीक दुर्गा देवीची तिसऱ्या दिवशी सौंदर्य व शौर्याचे प्रतीक असलेल्या चंद्रघंटा देवीची चौथ्या दिवशी विश्वाची निर्मिती करणाऱ्या कृष्मांडा देवीची पाचव्या दिवशी स्कंद माता म्हणजे शुर योध्दा स्कंद यांच्या आईची, सहाव्या दिवशी तीन डोळे व चार हात असलेल्या कात्यायनीची सातव्या दिवशी लोकांना निर्भय बनवणाऱ्या काल रात्री देवीची आठव्या दिवशी शांती व शहाणपण यांचे प्रतीक असलेल्या महागौरीची तर नवव्या दिवशी सर्व सिद्धी प्राप्त केलेल्या व जिची योगी आणि ऋषी सुद्धा पूजा करतात अशा सिध्दीदात्री देवीची पूजा करतात अशा शक्तीरुपींनी देवतांचा हा नवरात्र उत्सव त्यामधील नावे अनेक शक्ती एक. दृष्टांचे परिपात्य आणि सज्जनांचे रक्षण अशा या कृपामयीदेवीचा हा उत्सव प्रत्येक स्त्री शक्ती देवता आहे तिला आदराची समानतेची वागणूक देणे केवळ भोग वस्तू न मानता तिच्यातील शक्तीला जागृत करणे ही आज समाजामध्ये गरज निर्माण झाली आहे समाजामध्ये आज स्त्रियांवर बालिकांवर होणारे अत्याचार नष्ट करण्यासाठी समाज सुसंस्कृत झाला पाहिजे नवरात्रात देवीची पूजा उपासना करताना स्त्रियांनी स्वतःच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढायला शक्ती मिळावी म्हणून देवीची प्रार्थना करावी शक्तीचा उपयोग स्वतः बरोबर समाजासाठी करावा व तिचा विधायक वापर करावा आजही समाजात वेगवेगळ्या प्रकारे असुरांचे अस्तित्व आहे ते नष्ट करण्याचा प्रयत्न करावा आज समाजाच्या गरजा बदललेल्या आहेत. वेळ काढून देवीची भक्ती करावी व सामाजिक बांधिलकी ठेवून भक्तीला अधिक व्यापक करावे पर्यावरणाची पुजा करावी आपले घरदार स्वच्छ करत असताना सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे स्वच्छ राहतील याची काळजी घ्यावी.
श्री कमला भवानी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम जोरदार चालू असून त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे मंदिर उभारणीला जवळ जवळ २५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उन वारा पावसाने शिखर व गोपूरे जिर्ण झाली आहेत त्या मुळे पुरातन होते तसेच नुतनीकरण चालू आहे. मंदिर पूर्णपणे मूळ स्वरूपात आणण्यासाठी व मंदिराचा पुरातन वारसा जपण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत त्यासाठी चुन्याचा वापर करून मंदिराला मूळ स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे यासाठी सर्व भक्त जणांनी योगदान देणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तज्ञ लोकांचा मार्गदर्शन व सल्ला घेऊन त्यांच्या देखरेखी खाली मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम चालू आहे नवरात्र उत्सवाची तयारी व जिर्णोध्दाराचे काम याची लगबग वाढलेली असून हे काम बरेच दिवस चालणार आहे हे काम यशस्वी होण्यासाठी विश्वस्त व ग्रामस्थ यांनी प्रयत्न चालू केले आहेत. नेहमी प्रमाणे अन्नछत्र मंडळाचे कार्यकर्ते नऊ दिवस महाप्रसाद वाटपासाठी तयारी करत आहेत. बालगोपाळांसाठी उंच पाळणे, खाद्यपदार्थ दुकाने सजलेली आहेत. याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे. एकूणच भक्तिभावाने भरलेल्या या उत्सवाची भक्तगण आतुरतेने वाट पाहत आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष