इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न.
By : Polticalface Team ,17-10-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी) 14 ऑक्टोबर रोजी मुख्याध्यापक दांगडे एच .के . यांच्या उपस्थितीत विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली , सर्व सेवकांच्या उपस्थितीत वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. प्रथमत: अध्यक्षांच्या व सर्व बंधू भगिनींच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर कु. साळवे अनुष्का, चाकणे रिद्धी या विद्यार्थिनींची भाषणे झाली. त्याच्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री भगवान दिघे यांनी आपल्या विशेष शैलीत बहारदार भाषणातून डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी डॉ. अब्दुल कलाम यांनी केलेल्या क्षेपणास्त्रासंबंधी कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सर्वात शेवटी कला शिक्षक श्री संतोष भोईटे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगून सर्वांचे आभार मानले..
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी ठोकळे या विद्यार्थिनींने केले.अत्यंत उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
वाचक क्रमांक :