ओम साई इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

By : Polticalface Team ,17-10-2023

ओम साई इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न बारामती प्रतिनिधी भिमसेन जाधव 9112131616 -: मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहराप्रमाणे बारामती सुद्धा नवनवीन संकल्प घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ते उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित (दादा) पवार यांच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी बारामती मध्ये राबवल्या आहे. नेहमी दादा बारामतीचा विकास तसेच महाराष्ट्राचा विकास देखील करण्याचा प्रयत्न व नवनवीन गोष्टी महाराष्ट्रत तसेच बारामतीत राबवण्याचा प्रयत्न करतात . त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे यांची भाचे व आरोग्य सहायक, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नागरिकसंघ बारामती शहर उपाध्यक्ष मा. श्री.लक्ष्मण बगाडे यांचे नातू कु.रोहन सोनवणे यांनी ओम साई इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी या नावाने ऑफिस बारामतीकरांच्या सेवेसाठी सुरू केले आहे.
त्यामध्ये वेलकम एन्ट्री ला लागणारे नवीन अपडेट चे उपकरणे , एलईडी लाईट, बाहुबली रथ, मटकी, कोल्ड प्यारो, बबल मशीन, स्मोक मशीन, पेपर ब्लास्ट मशीन, तसेच एक ना अनेक साहित्य, तसेच साऊंड सिस्टीम तसेच वाढदिवसासाठी मुला - मुलींच्या लग्नासाठी लागणारे सर्व प्रकारचे इव्हेंटचे साहित्य एका छताखाली ते म्हणजे ओम साई इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापन केली.
असून याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री अजित (दादा) पवार साहेब यांच्या हस्ते रविवार दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 2:30वाजता इनामदार कॉर्नर, देशमुख चौक,पाटस रोड, बारामती या ठिकाणी करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या सत्कार जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे शांततेचे प्रतीक तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती व बौद्ध वृक्ष देऊन बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे तसेच त्यांचे भाचे रोहन सोनवणे बारामती लाईव्ह चे कायदेशीर सल्लागार ॲड. अनिल कुमार बागुल ( सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया नवी दिल्ली, हायकोर्ट मुंबई) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.
तसेच या सुंदर अशा उद्घाटन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित(दादा) पवार यांनी शुभेच्छा देत असताना बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे यांचे व त्यांच्या कुटुंबाचे कौतुक देखील केले.
तसेच रोहनला व्यवसाय कसा करावा याचे मार्गदर्शन व सल्ले दिले.
याप्रसंगी बारामती तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी (नाना )होळकर देखील उपस्थित होते तसेच बारामती लाईव्ह कायदेशीर सल्लागार ॲड. अनिल कुमारजी बागुल ( सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया नवी दिल्ली, मुंबई हायकोर्ट ), तसेच माजी शहराध्यक्ष नितीन शेंडे, खरेदी विक्री संघाचे बापू (सरपंच )गवळी, बिल्डर असोसिएशनचे खराडे साहेब, ज्येष्ठ नागरिक संघाचे शहराध्यक्ष टी.व्ही.मोरे दादा, सामाजिक कार्यकर्ते विशाल खंडाळे,( गणेश डी.जे)चे मालक गणेश गवळी,बिल्डर सावंत साहेब(पुणे ), हमारा विश्व फाउंडेशनच्या संस्थापिका अनिता अग्रवाल, भट्टू पाटील(पुणे ), अस्लम शेख, बारामती लाईव्हचे सहसंपादक रमीज जादगार, बारामती लाईव्ह चे प्रतिनिधी भीमराव कांबळे, पत्रकार स्वप्निलजी कांबळे, पत्रकार संदीपजी साबळे, पत्रकार विकासजी कोकरे, पत्रकार वसंतजी मोरे, जन आधार न्युज .भिमसेन जाधव .सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडियाचे पत्रकार बंधू देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मित्रपरिवार व पै-पाहुणे देखील उपस्थित मोठ्या संख्येत होते .
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक सावळे पाटील यांनी अत्यंत सुंदर असे सूत्रसंचालन केले. त्यांचे देखील आभार
तसेच कार्यक्रमाचे फोटोग्राफी ओम साई फोटो शॉप चे मालक विशाल साळुंखे हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील अत्यंत सुंदर फोटो टिपले त्यांचे देखील आभार.
अशाप्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री अजित(दादा )पवार साहेब यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल बगाडे परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार मानले .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष