मी माजी आमदार नारायणा आबा पाटील यांचा समर्थक, आमदार संजय शिंदे यांचा माझा कसलाही संबंध नाही उपसरपंच अंगद गोडसे यांचा खुलासा
By : Polticalface Team ,23-10-2023
करमाळा प्रतिनिधी
मी माजी आमदार नारायण पाटील यांचा कट्टर समर्थक असून आमदार संजय शिंदे यांच्याशी माझा दूरवर कसलाही संबंध नाही असे जेऊरचे विद्यमान उपसरपंच अंगद गोडसे यांनी सांगितले. जेऊर ग्रामपंचायतीची निवडणूक चालू असून उपसरपंच अंगद गोडसे यांनी विद्यमान आमदार संजय शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु आज स्वतः अंगद गोडसे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांची जेऊर येथे भेट घेतली व कालची घटना कशी झाली हे सांगीतले. याबाबत अधिक सविस्तरपणे बोलताना अंगद गोडसे यांनी सांगितले की मी काल माझ्या वैयक्तिक कामासाठी टेंभुर्णी येथे गेलो असता परत गावी येत असताना शेलगाव (वा) चौकात जेऊर येथील नागरीक थांबले असल्याचे दिसून आले. मी उपसरपंच असल्याने काही अडचण असेल ते पहावे म्हणून तेथे थांबलो असता तेथे विद्यमान आमदार संजय शिंदे आले व त्यांनी माझ्याशी कसलीही चर्चा नाही करता थेट माझा सत्कार केला व प्रसिध्दी माध्यमांना मी त्यांच्या गटात प्रवेश केला असल्याचे सांगीतले. वास्तविक पाहता मी माजी आमदार नारायण पाटील यांचा कट्टर समर्थक असतानाही जेऊर ग्रामपंचायतीची निवडणूक पाहून आमदार शिंदे गटाकडून जर माझ्यासारख्या जबाबदार पदाधिकारी बाबत अशी फसवणूक करून गट प्रवेश झाल्याचे सांगीतले जात असेल तर सर्वसामान्य जनतेची फसवणूक व दिशाभूल करण्यास विद्यमान आमदार संजय शिंदे व त्यांचे जेऊर येथील समर्थक जराही कचरत नसतील. यावरून आता आमदार शिंदे गट जनतेसमोर उघडा पडला असून असे दिशाभुल करणारे राजकारण जेऊर ग्रामस्थ तरी खपवून घेणार नाहीत. गेल्या चार वर्षांत विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी जेऊर साठी एक रुपयाचा निधी दिला नाही. याउलट आपल्या समर्थकाना पुढे घालून जेऊर गावाला सतत बदनाम करण्याचे काम केले अशा आमदार शिंदे गटास मी भीक घालत नाहीं. मी माजी आमदार नारायण पाटील यांचा कट्टर समर्थक असून त्यांनी जेऊर सारख्या मोठ्या शहराच्या उपसरपंच पदावर राहून काम करण्याची संधी मला दिलीं. चालू निवडणुकीत सुद्धा माजी आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलचे सरपंच पदासह सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार अशी खात्री उपसरपंच अंगद गोडसे यांनी बोलून दाखवली
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.