By : Polticalface Team ,24-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २४ ऑक्टोबर २०२३ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील माणकोबावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि,२३/१०/२०२३ रोजी महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, नवरात्री महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मा. वैशालीताई आबणे, दौंड पंचायत समितीच्या माजी सभापती उषाताई चव्हाण, यवत ग्रामपंचायत सदस्य नंदाताई बिचकुले, सामाजिक कार्यकर्त्या रेश्माताई खोरकर. यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती. मानकोबावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती माने, अंगणवाडी कार्यकर्त्या सुवर्णा शिवतरे अदी शिक्षक शिक्षिका पालक व विद्यार्थी मुलं मुली उपस्थित होते,
माणकोबावाडी मुख्याध्यापिका स्वाती माने यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.वैशालीताई आबणे बोलताना म्हणाल्या *"शालेय जीवनात विध्यार्थ्यांना आपल्या रुढी परंपरा व संस्कृतीची माहीती व्हावी, तसेच त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी शांळांमधून होणाऱ्या सार्वजनिक विविध कार्यक्रमांना खूप महत्व आहे* मुख्याध्यापिका स्वाती माने यांनी याप्रसंगी भोंडला कार्यक्रमाविषयी माहीती दिली. तसेच विध्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शाळेत अभ्यास क्रमासोबतच *पालखी सोहळा, दहीहंडी, रक्षाबंधन, महाभोंडला, असे विविध कार्यक्रम राबवित असल्याचे सांगितले .* यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी ऐलमा पैलमा गणेश देवा या व इतर भोंडला गीतावर ठेका धरला. तसेच दांडीया खेळाचा आनंद लुटला. याप्रसंगी विध्यार्थ्यांसाठी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी शाळेतील शिक्षक संदिप साळवे, विक्रम लांडगे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर खताळ. मारुती बिचकुले, मल्हारी बिचकुले तसेच महीला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल स्थानिक पालकांनी समाधान व्यक्त केले.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक