यवत येथे मराठा कुणबी आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष ग्रामसभेचे आयोजन. राजकीय लोकप्रतिनिधींना. गाव प्रवेश बंदीचा ठराव मंजूर. यवत गाव बंद. बेमुदत साखळी उपोषण सुरू.

By : Polticalface Team ,31-10-2023

यवत येथे मराठा कुणबी आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष ग्रामसभेचे आयोजन. राजकीय लोकप्रतिनिधींना. गाव प्रवेश बंदीचा ठराव मंजूर. यवत गाव बंद. बेमुदत साखळी उपोषण सुरू. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ३० ऑक्टोबर २०२३. मौजे अंतरावली सराटी ता अंबड जिल्हा जालना. येथे मनोज जरांगे पाटिल यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथे सोमवार दि ३० ऑक्टोबर २०२३ रोजी मराठा कुणबी आरक्षणाच्या मुद्द्यावर यवत ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच समीर दोरगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटिल यांनी यवत येथे भेट दिली होती. महाराष्ट्र राज्यातील सरसकट मराठा कुणबी आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटिल यांनी आरक्षण संदर्भात महत्वपूर्ण समाज जनजागृती केली होती. राज्य सरकारला दिलेला वेळ संपुष्टात आला आहे. तरी देखील राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला असल्याचे दिसत नाही. सरसकट मराठा कुणबी आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचे वादळ शांत होणार नाही. अशी भूमिका जरांगे पाटिल यांनी घेतली आहे. ते म्हणतात मराठा कुणबी असल्याचा हा घ्या पुरावा राज्य सरकारने जीआर काढावा. आता माघार नाही. सरकारने स्वाता: एक महिन्याभराचा वेळ मागीतला होता. त्या प्रमाणे. राज्य सरकारने सरसकट मराठा कुणबी आरक्षण संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील मराठा कुणबी समाज जागृत होऊन पेटुन उठला आहे. मराठा कुणबी आरक्षण संदर्भात सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. अशी महाराष्ट्र राज्यातील व यवत पंचक्रोशीतील अखिल मराठा समाजाच्या वतीने मागणी केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील अखिल मराठा कुणबी समाजाच्या वतीने मंगळवार दि ३१ रोजी यवत ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभेत सरपंच समीर दोरगे यांच्या अध्यक्षतेखाली एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. या मध्ये प्रामुख्याने मराठा कुणबी आरक्षण संदर्भात सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत. राजकीय क्षेत्रातील लोक प्रतिनिधींना यवत गावात प्रवेश बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी विशेष ग्रामसभेत उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये प्रामुख्याने अखिल मराठा समाजातील शेतकरी. जेष्ठ नागरिक. सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी युवा तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा कुणबी आरक्षण संदर्भात यवत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी (कुल - थोरात) राजकारण बाजुला ठेवून दोन्ही गटातील सर्व मराठा कुणबी समाज एकत्रित आला असल्याचे दिसून आले. मनोज जरांगे पाटिल यांच्या अमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सकल मराठा कुणबी समाज एकवटला असल्याचे बोलले जात असुन. गाव गाड्यात विकासाच्या दृष्टीने गाव गाड्यात एकोपा ठेवणे काळाची गरज असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे. जुन्या पारंपरिक आठवणींना उजाळा दिला. देशी खिल्लारी गायचे वासरु आई कडे धावते. मात्र अंतुल्या कोणालाही डुसण्या मारते. अशी परिस्थिती राजकीय क्षेत्रातील लोक प्रतिनिधींची झाली आहे. (एकिचे बळावर) भविष्यात गाव पातळीवर विकासात्मक व महत्वपूर्ण भूमिका घेतल्यास अत्यंत महत्त्वाची ठरेल. मनोज जरांगे पाटिल यांच्या अमरण उपोषणाच्या माध्यमातून राज्यातील अनेक वर्षापासून असलेले बेकीचे राजकारण संपुष्टात आले असल्याचे
अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
यवत ग्रामपंचायत विशेष ग्रामसभेत सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. तसेच मनोज जरांगे पाटिल यांच्या प्रकृती बाबत चिंता ही व्यक्त करण्यात आली. जरंगे पाटील यांनी किमान पाणी तरी घ्यावे. अशी प्रतिक्रिया दिवेकर यांनी व्यक्त केली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या प्रसंगी यवत गावचे सरपंच समीर दोरगे. उपसरपंच सुभाष यादव माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथदेव दोरगे. माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सदानंद दोरगे. माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड. यवत ग्रामपंचायतीचे सदस्य इम्राहीम तांबोळी. गौरव दोरगे. राजेंद्र शेंडगे. राजेंद्र खुटवड. गणेश शेळके. दिलीप शेठ यादव. दत्तात्रय दोरगे. दशरथ दोरगे. कैलास आबा दोरगे. पंडीत भाऊ दोरगे. रामभाऊ बोत्रे. अशोकराव दोरगे. आदी यवत गावातील मराठा समाजातील सर्व युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी एस सी. एसटी. ओबीसी. समाजातील मान्यवरांनी विशेष ग्रामसभेत बोलताना. मराठा कुणबी समाजाला आरक्षण मिळावे अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन. जाहिर पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये यवत जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जनार्दन चांदगुडे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दौंड तालुका मा उपाध्यक्ष अनिल गायकवाड. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर. युवराज मेहता. मुस्लिम समाजातील काँग्रेस पार्टीचे मोसिन भाई तांबोळी. या मान्यवरांनी समाजाच्या वतीने मराठा कुणबी आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या प्रसंगी यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे. उपसरपंच सुभाष यादव. माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड. अनिल गायकवाड. दत्ता डाडर. अरविंद दोरगे. श्रीपतीराव दोरगे. युवा कार्यकर्ते महेशराव तसेच स्मिता ताई दिवेकर. दोरगे ताई या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिराच्या दक्षिण बाजूकडील पुणे सोलापूर महामार्ग लगत उद्यापासून होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणात सहभागी होणार असल्याचे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर यांनी बोलले सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते दिलीप शेठ यादव यांच्या सुचनेनुसार विशेष ग्रामसभे नंतर दुपारी सर्व मराठा बांधवांनी एकत्रित जोरदार गाव प्रदक्षिणा केली. तसेच यवत पंचक्रोशीतील हजारो महिला व नागरिकांनी सायंकाळी ७ वाजता श्री काळभैरवनाथ मंदिरापासून जोरदार कॅन्डल मार्च काढण्यात आला. या प्रसंगी यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक कांबळे साहेब व चार पोलीस कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. यवत पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी सहभागी होऊन मराठा कुणबी आरक्षण संदर्भात एक मराठा लाख मराठा घोषणा देऊन यवत गाव दणाणून गेले होते. या प्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरत होती. यवत पंचक्रोशीतील. मराठा कुणबी बांधवांनी मंगळवार दि ३१ रोजी यवत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असुन बेमुदत साखळी उपोषण संदर्भात यवत पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आहे.
यवत अखिल मराठा समाजातील युवा तरुणांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामध्ये प्रामुख्याने दादासाहेब माने. राहुल शेळके. आबासाहेब दोरगे. आण्णासाहेब दोरगे. सुरज चोरगे. मयुर दोरगे. गणेश दोरगे. या युवकांनी महत्वपूर्ण भूमिका घेऊन मंगळवार पासुन बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक