मागील गाळप हंगामाचे 75 रुपये प्रमाणे पेमेंट 4 ऑक्टोबरला ऊस उत्पादकांच्या खात्यात वर्ग करणार नागवडे
By : Polticalface Team ,01-11-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)- सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखाना चालू वर्षी गाळप हंगामात ऊस भाव जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांप्रमाणेच देईल, तर मागील ऊस गाळपाचे पेमेंट 75 रुपये प्रमाणे 4 ऑक्टोबर रोजी ऊस उत्पादकांच्या खात्यात वर्ग केले जातील, असे आश्वासन सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
सहकार महर्षी नागवडे कारखान्याचा सन 2023 24 या ४९ व्या गाळप हंगामाचा शुभारंभ तालुक्यातील 101 महिला भगिनींच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी कारखान्याचे संचालक त्यांच्या सुविध्य पत्नी व अन्य सभासदांच्या हस्ते गव्हाणीची विधीवत पूजा करण्यात आली. आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे पुढे म्हणाले की, चालू वर्षीच्या गाळप हंगामासाठी कारखाना प्रशासन सज्ज झाले आहे. चालू वर्षी ऊस गाळपाचे पहिले ऊस पेमेंट 2500 रुपये प्रमाणे नागवडे कारखाना देणार आहे त्यामुळे एफ आर पी नुसार मागील वर्षीचे 2600 रुपये कारखान्याने ऊस उत्पादकांना अदा केले आहेत. परंतु तालुक्यातील व बाहेरील बंद पडलेले खाजगी कारखाने पुन्हा सुरू झालेले आहेत. अशा परिस्थितीत सहकारी साखर कारखान्यापुढे ऊस गाळपाची स्पर्धा असणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादन व सभासदांनी बाहेरील कारखान्यांना उस न देता सहकार महर्षी बापूंनी जीवापाड जोपासलेल्या आपल्या नागवडे कारखाना या कामधेनूला चालू वर्षाच्या गाळप हंगामा करिता ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करत श्री नागवडे पुढे म्हणाले की, चांगला प्रतीचा ऊस सभासद ऊस उत्पादक हे बाहेरील कारखान्याला देतात आणि खराब ऊस नागवडे कारखान्याला देतात हे योग्य नाही. त्यामुळे ऊस रिकवरी खालवली जाते. तालुक्याची ही सहकार चळवळ मोठ्या कष्टातून सहकार महर्षी बापूंनी उभी केली आहे. या सहकार चळवळीमुळेच तालुक्याची सर्वांगीण प्रगती झालेली सर्वांनी पाहिली. त्यामुळे सहकार टिकला तरच सर्वसामान्य शेतकरी व ऊस उत्पादकांना भविष्य चांगले आहे. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की, मागील गाळपात इतर कारखान्यांनी 2500 पर्यंत ऊस भाव दिला. संगमनेरने मात्र 2700 पर्यंत ऊस भाव दिला. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्यासाठी नागवडे कारखान्याचे संचालक मंडळ तत्पर आहे. चालू गाळप हंगामात कारखान्याचे किमान आठ लाखापर्यंत गाळपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत गाळतात नागवडे कारखान्याने ऊस उत्पादकांची वेळेत ऊस पेमेंट दिले कामगारांचे देखील पगार व बोनस वेळेत अदा केले आहेत.
असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की, पावसाने विलंब केल्याने तालुक्यातील पाणी गंभीर बानला होता आपण तालुक्यातील सहकाऱ्यांना बरोबंर घेऊन आंदोलन करून घोड धरणात कमी पाणीसाठा असताना सरकारला पाणी सोडण्यास भाग पाडले. योगायोगाने पावसानेही उत्तम प्रकारे साथ दिली. त्यामुळे धरणे देखील भरली. अन्यथा तालुक्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला असता आपण नेहमीच सहकार महर्षी वैचारिक दृष्टिकोनातून सर्वसामान्यांच्या हितासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहोत. या कामी संचालक मंडळाचे देखील बहुमोल सहकार्य लाभत आहे. दिवाळीसाठी नवीन सभासदांना देखील साखर वाटप करून त्यांची ही दिवाळी गोड करणार आहोत. असे नागवडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून सभासद शेतकरी ऊस उत्पादकांचे सहकार महर्षी बापूंनी आपले जिव्हाळ्याचे नाते जोपासले. श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला बापूंनी सहकाराच्या माध्यमातून वैभव प्राप्त करून दिले. बापूंनी देखील सर्वसामान्य शेतकरी व ऊस उत्पादकांना योग्य वेळी योग्य न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. बापूंचाच वारसा अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व संचालक मंडळ कारखान्याचा पारदर्शी व काटकसरीने कारभार करत अगदी नेटाने पुढे चालवत आहेत. असे सांगून संचालिका सौ नागवडे यांनी चालू हंगामास शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस मार्गदर्शन भाषणात म्हणाले की, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे नागवडे कारखान्याने तालुक्यातील 101 महिला भगिनींच्या हस्ते गाळप हंगामाचा शुभारंभ केला. हा स्तुत्य उपक्रम कारखान्याने राबवला. कारण महिला देखील पुरुषाच्या बरोबरने सर्वच क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करत आहेत. निश्चितच यापुढे सहकार व अन्य क्षेत्रात महिलांनी देखील योगदान देण्यासाठी पुढे आले पाहिजे. असे सांगून श्री भोस पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी या दुष्काळी तालुक्याला पुढे नेण्यासाठी मोठ्या कष्टाने सहकार चळवळ उभी केली. अगदी शिक्षण क्षेत्रात देखील कर्मवीर अण्णांच्या बरोबरीने शिक्षण या पवित्र क्षेत्रात योगदान दिले. प्रसंगी अडचणीच्या काळात सहकार महर्षी बापूंनी ऊस उत्पादक सभासद कामगारांना मोठा जनआधार दिला. म्हणूनच श्रीगोंदा तालुक्याची आज मोठी भरभराट दिसून येत आहे. तेव्हा ऊस उत्पादक व सभासदांनी चालू गाळप हंगामात आपल्या कामधेनूलाच ऊस देण्याचे आवाहन केले.
या गाळप हंगामाच्या कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, अॅड बाळासाहेब काकडे, टिळक भोस, गणपत फराटे, छबुराव घाडगे, राम अण्णा नागवडे, सुरेश लोखंडे, विलास वाघमारे, दिनेश इथापे, दिलीप काटे, रामदास झेंडे, किसन मसाले, अर्जुन मचाले आदींसह तालुक्यातील प्रमुख महिला भगिनी, नागवडे कारखान्याचे आजी-माजी संचालक, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सर्व खाते प्रमुख, सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक संचालक प्रशांत दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन संचालक शरद जगताप यांनी तर आभार संचालक सावता हिरवे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.