पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी उपोषण
By : Polticalface Team ,04-11-2023
जन आधार न्युज बारामती प्रतिनिधी
भिमसेन जाधव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय बारामती येथील कंत्राटी कर्मचारी यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या तसेच कर्मचारी व कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला रुग्णालयात मोफत उपचार मिळावे.या मागणीसाठी दिनांक ०२/११/२०२३ स. ११:०० वा.पासून चक्री उपोषण करणार आहे तरी या उपोषणाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर बारामती शहराध्यक्ष सुरज येवले ओबीसी विभाग तसेच इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पाठिंबाचे पत्र कंत्राटी कामगार यांना देण्यात आले
वाचक क्रमांक :