सुरोडी सेवा संस्थेकडून सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप
By : Polticalface Team ,13-11-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी येथील सेवा संस्थेने सभासदांना प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी डिव्हिडंड वाटप केले असून यावर्षी 15 टक्के प्रमाणे डीव्हीडंड वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन भास्करराव वागस्कर यांनी दिली. यावेळी अधिक माहिती देताना चेअरमन भास्करराव वागस्कर यांनी सांगितले की, संस्थेने दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दिवाळी सणानिमित्त मागील आर्थिक वर्षातील संस्थेच्या नफ्यातून सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंड वाटप केले आहे. याप्रसंगी गावचे सरपंच सौ मीना सकट व उपसरपंच मनोहर वागस्कर यांचे असते सभासदांना डिव्हिडंड वाटप करण्यात आले.
संस्थेच्या वाटचाली संदर्भात अधिक माहिती देताना संस्थेचे चेअरमन भास्करराव वागस्कर यांनी सांगितले की, संस्थेचे एकूण सभासद 450 आहेत कर्ज वाटप दहा कोटी रुपये असून, बँक पातळीवर मागील आर्थिक वर्षातील संस्थेची शंभर टक्के कर्ज वसुली झाली आहे. संस्थेच्या माध्यमातून सभासदांना पीक कर्ज, पाईपलाईन, खावटी कर्ज, संकरित गायी कर्ज संस्था वाटप करते. संस्थेचा दरवर्षी शंभर टक्के कर्ज वसुली असून, दरवर्षी सभासदांना डिव्हिडंड वाटप करण्यात येते. संस्थेचा नफा 30 जून रोजी 45 लाख रुपये इतका आहे. त्यातून सभासदांना सव्वा आठ लाख रुपये डीव्हीडंड वाटप करण्यात आल्याची माहिती चेअरमन भास्करराव वागस्कर यांनी दिली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष पोपटराव वागस्कर व संचालक मंडळ तसेच सचिव बबनराव भागवत यांचे कर्ज वसुली व संस्थेच्या प्रगतीसाठी मौलिक सहकारी लाभत असल्याचे चेअरमन भास्करराव वागस्कर यांनी यावेळी सांगितले.
वाचक क्रमांक :